मलिकांच्या जामीनासाठी ३ कोटी द्या! फसवणुकीविरोधात फराज मलिकांची तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik vs ED

मलिकांच्या जामीनासाठी ३ कोटी द्या! फसवणुकीविरोधात फराज मलिकांची तक्रार

मुंबई: नवाब मलिक यांच्या मुलाने म्हणजेच फराज मलिक यांनी विनोबा भावे नगर पोलिसात तक्रार केली आहे. इम्तियाज नावाच्या एका अनोळखी व्यक्तीवर हा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. कुर्ला येथील जमीन व्यवहारमध्ये ईडीने नवाब मलिक यांचे दाऊदशी संबध असून आकसाने कारवाई केली, असल्याचं त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा: अखेर प्रवीण चव्हाणांनी तेजस मोरेंविरोधात नोंदवली तक्रार; म्हणाले, 'गोपनीयतेचा...'

या कारवाईमधून जामीन मिळवून देण्यासाठी 3 कोटी रुपये जमा करण्याची मागणी या आरोपी इम्तियाजने फोनवर केली असल्याचं फराज मलिक यांनी म्हटलंय. तसेच ही मागणी करुन आरोपीने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे हे पैसे बिटकॉईन स्वरुपात मागण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी वकिल आमीर मलिक यानी विनोबा भावे नगर पोलिसात इम्तियाज नावाच्या व्यक्तिवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: "पेपरफुटीची प्रकरणं आढळल्यास शाळांची मान्यता काढणार"

दुसरीकडे, मुंबई उच्च न्यायालयानं राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना धक्का दिलाय. केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच, ईडीची कारवाई कायदेशीरच असल्याचं सांगत न्यायालयानं मलिक यांनी दाखल केलेली याचिका (HC Rejected Nawab Mailk Petition) फेटाळून लावलीय. ईडीनं आपणास केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या या संस्थेच्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. आपणास करण्यात आलेली अटक ही कायद्याला धरुन नसल्याचं मलिकांचं म्हणणं होतं. मात्र, काल (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) मलिक यांची याचिका फेटाळून लावलीय.

Web Title: Pay For Nawab Malik Ed Bail Faraz Malik Complaint Lodged Complaint Against The Fraudster

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top