esakal | Pegasus Reports: फोन हॅक करण्याची बाब गंभीर; चौकशी व्हायलाच हवी!
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab-Malik-NCP

Pegasus Reports: फोन हॅक करणं गंभीर बाब; चौकशी व्हायलाच हवी!

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: भारतातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, न्यायाधीश आणि उद्योगपती यांच्यावर पेगाससच्या (Pegasus Reports) माध्यमातून पाळत ठेवून फोन हॅक (Phone Hacking) करण्यात आल्याची बाब गंभीर (Serious Matter) आहे. या प्रकरणाची चौकशी (Enquiry) करून जो जबाबदार असेल त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई (Action) व्हायलाच हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. (Pegasus Phone Hacking Tapping Case NCP Leader Nawab Malik asks for Enquiry and Action)

हेही वाचा: Pegasus Case: हे तर जाणीवपूर्वक देशाच्या बदनामीचं षडयंत्र!

पेगाससने सॉफ्टवेअर स्पायवेअरच्या मदतीने जगभरातील आणि भारतातील काही लोकांचे फोन हॅक केल्याचा मुद्दा समोर आला. इस्त्रायलमधील सॉफ्टवेअर एजन्सीने आमचं सॉफ्टवेअर फक्त सरकारलाच विकत असल्याचे स्पष्ट केले आहे. जर खाजगी लोकांना विकण्यात आलेले नाही तर केंद्र सरकारच्या कुठल्या एजन्सीने देशातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, न्यायाधीश, उद्योगपती यांचे फोन हॅक करुन पाळत ठेवली?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला. तसेच, केंद्र सरकारच्या माहितीसाठी हे करण्यात आले असेल तर कुठल्या अधिकार्‍याने किंवा एजन्सीने फोन हॅक करुन पाळत ठेवली, याचे उत्तर मोदी सरकारने जनतेला दिले पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा: मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; काँग्रेसचे दोन जण 'डेंजर झोन'मध्ये?

काय आहे पेगासस प्रकरण?

पेगासस (Pegasus) या फोन हॅकिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जगभरातील हजारो लोकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, असा दावा काही मोठ्या मिडिया हाऊसेसने केला. यात भारतीय राजकीय नेते, पत्रकार आणि कार्यकर्त्यांचेही फोन टॅपिंग झाल्याचा दावा करण्यात आला. भारत सरकारने तत्काळ हा दावा फेटाळून लावला. पण विरोधकांनी यावरून संसदेत आणि संसदेबाहेरही गदारोळ केला.

loading image