Tiger
Tiger

पेंच, ताडोबातील पर्यटन ऑक्टोबरपासून

नागपूर - विदर्भातील पेंच, बोर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन एक ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार पावसाच्या स्थितीनुसार उघडतील. आगामी दिवसांत पावसाने हजेरी लावल्यास १५ ऑक्‍टोबरपासून अन्यथा एक ऑक्‍टोबरला प्रकल्प सुरू होतील. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर पेंचमधील बुकिंगच्या दरात बदल केले आहेत. 

पेंच व्याघ्र प्रकल्पात दोन महिने ते चार महिने या काळात बुकिंग केल्यास या दोन्ही गेटवर  सोमवार ते शुक्रवारसाठी नोंदणीशुल्क दोन हजार रुपये तर शनिवारी आणि रविवारसाठी चार हजार रुपये आकारण्यात येतील. ६० दिवस आणि त्यापेक्षा कमी दिवस आधी नोंदणी केल्यास सोमवार ते शुक्रवारसाठी एक हजार रुपये, तर शनिवार आणि रविवारसाठी दोन हजार रुपये शुल्क आकारले जाईल. ही पद्धत सर्वप्रथम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात राबविण्यात आली. त्याला मिळालेल्या यशानंतर आता पेंचमध्ये ही पद्धती अवलंबण्यात येत आहे. कॅंटरसाठी प्रतिव्यक्ती ३५० रुपये शुल्क आकारले जाईल. गाइड्‌सकरिता ३५० रुपये मोजावे लागतील. सिल्लारी येथून सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येक २३ जिप्सी, खुर्सापार येथे प्रत्येकी १९ जिप्सींची सुविधा उपलब्ध राहील. 

पेंच आणि बोर व्याघ्र प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य आणि टिपेश्वर अभयारण्य येथील दरांमध्येही बदल केले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी, खुर्सापार, कोलितमारा, चोरबाऊली, सालेघाट, सुरेवानी आणि पवनी तर बोर व्याघ्र प्रकल्पातील बोरधरण व आडेगाव प्रवेशद्वारावरून सफारी उपलब्ध आहे. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील कऱ्हांडला, पुल्लर, पवनी, गोठणगाव प्रवेशद्वारांवरून तर टिपेश्वर अभयारण्यातील सुन्ना आणि माथनी येथून सफारी सुरू आहे. १६ ऑक्‍टोबरपासून या सर्व ठिकाणी ऑनलाइन सफारी सुरू होणार आहे. एक ऑक्‍टोबरपासून ऑफलाइन सफारी उपलब्ध राहील. नवेगाव-नागझिरा अभयारण्याचे प्रवेशद्वार पावसाच्या स्थितीनुसार उघडेल. यंदा प्रवेश शुल्कात वाढ केल्याचे विभागीय  वनाधिकारी उत्तम सावंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com