esakal | महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारले - शरद पवार 
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar

विधानपरिषदेच्या धुळे आणि नंदुरबार मतदारसंघाच्या निकालाचे आश्‍चर्य वाटले नाही. परंतु भाजपचे बालेकिल्ले असलेल्या पुणे आणि नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीला मिळालेले यश खूप महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीने गेले वर्षभर एकत्रित काम केले, त्याला जनतेने स्वीकारले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केली.

महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारले - शरद पवार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - विधानपरिषदेच्या धुळे आणि नंदुरबार मतदारसंघाच्या निकालाचे आश्‍चर्य वाटले नाही. परंतु भाजपचे बालेकिल्ले असलेल्या पुणे आणि नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीला मिळालेले यश खूप महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीने गेले वर्षभर एकत्रित काम केले, त्याला जनतेने स्वीकारले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर ते शुक्रवारी (ता. 4) पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, महाराष्ट्राचे चित्र बदलत असून, सर्वसामान्य जनतेचा महाविकास आघाडीला पाठिंबा मिळत आहे. 

राज्यात ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजन; 65 ते 70 हजार रिक्‍त जागा भरणार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीचा कल पाहता महाविकास आघाडीने मिळून नको, एकेकटे लढावे, असे आव्हान दिले होते. त्यावर पवार म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत ते कसे निवडून आले, हे त्यांनाही माहीत आहे. त्यांना अंदाज होता म्हणून त्यांनी सोयीचा मतदार संघ निवडला होता. त्यांना विश्‍वास असता तर मतदारसंघ बदलला नसता. त्यामुळे त्यांच्या विधानाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

Edited By - Prashant Patil