माझ्या बदनामीचा जाणीवपूर्वक प्रयत्न: सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

चळवळ असो वा राजकारण ...याठिकाणी नेहमी युद्धाचेचं प्रसंग असतात. राजकारणात भविष्याचा कानोसा घेतचं कार्यरत रहावं लागतं. वेळ काळ पाहूनचं निर्णय घ्यावे लागतात

मुंबई - ""खोत हे आता भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वाटेवर असल्याचे सांगून सोशल मिडीयाच्या माध्यमामधून माझ्या बदनामीचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असल्याची,'' प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व राज्यमंत्री (कृषी, फलोत्पादन व पणन) असलेल्या सदाभाऊ खोत यांनी आज (रविवार) एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केली. स्वाभिमानीचे प्रमुख नेते राजु शेट्टी यांच्याबरोबरील उघड मतभेदांच्या पार्श्‍वभूमीवर सदाभाऊ हे भाजप प्रवेश करतील, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सदाभाऊ म्हणाले -

# माझ्या बदनामीचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून जाणीवपुर्वक प्रयत्न सुरू...
# मी भाजपच्या वाटेवर असल्याची काहीजणांकडून वातावरण निर्मिती करण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न...
# मी वळलेल्या  वाटेवरुन जाणारा कार्यकर्ता नाही...स्वत:ची वाट निर्माण करणारा कार्यकर्ता...कुणी अस्मिता चेपणार असेल, अस्मितेवर कुणी घाला घालणार असेल? तर गप्प कसा बसू?                                                                      

# चळवळ असो वा राजकारण ...याठिकाणी नेहमी युद्धाचेचं प्रसंग असतात. राजकारणात भविष्याचा कानोसा घेतचं कार्यरत रहावं लागतं. वेळ काळ पाहूनचं निर्णय घ्यावे लागतात.
# राज्यमंत्री पदाला अधिकार आहेत का नाहीत, हा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा नाही. मी कृषी खात्याला शेतकऱ्यांच्या बांधावर घेऊन पोहोचलो.
# शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी  ऐन तारुण्यात राज्यभर फिरलो...तडजोडी केल्या असत्या तर यापुर्वीचं खासदार, आमदार झालो असतो.
# सरकारने ५५ लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे. डाळ साठवणुकीवरील निर्बंध उठवल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल.
# राज्यमंत्री झाल्यानंतर संत सावता माळी आठवडे बाजार अभियान राबवले. सभागृहात नियमनमुक्तीला विरोध असतानाही फळे आणि भाजीपाला नियमनमुक्ती केली. नियमनमुक्तीनंतर शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या तुटल्या. फळप्रक्रिया धोरण राबवायला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे.कडधान्य, तृणधान्य नियमनमुक्त केलं पाहिजे. मुंबईसह राज्यभर आंबा महोत्सव, कडधान्य महोत्सव भरवले...
# राज्यात शेतकऱ्यांच्या विकासासाठी गोदामाचे जाळं उभारावं लागेलं. अन्नदात्या शेतकऱ्यांला सन्मान मिळाला पहिजे. जलयुक्त शिवाराच्या अभियानाच्या माध्यमातून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक  सूरू आहे.
# दानवेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन कधीचं राजकारण केलं नाही.
# व्यापाऱ्यांच्या कचाट्यातून शेतकरी सोडवला पाहिजे. नाशिकची कांदा हब
म्हणून ओळख निर्माण होतेय.
# ग्रामीण भागात शेतीवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची उभारणी करावी लागेल.
# कृषी पर्यटन, सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना उभं करण्याचा प्रयत्न..
नाबार्डच्या माध्यमातून ठिबक सिंचनासाठी २६०० कोटींचं निधी उपलब्ध होणार..

Web Title: People are defaming me, sasy Sadabhau Khot