पावसाळ्याचे बळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

पावसाळा सुरू झाल्यापासून विविध दुर्घटनांत राज्यात आतापर्यंत 150 बळी गेले असून, 58 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच 153 व्यक्‍ती जखमी झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. यंदाच्या मान्सूनमध्ये देशभरातच अनेक दुर्घटना घडल्या असल्या तरी महाराष्ट्रात सर्वाधिक मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान झाल्याचे आपत्ती विभागातून सांगण्यात आले.

मुंबई - पावसाळा सुरू झाल्यापासून विविध दुर्घटनांत राज्यात आतापर्यंत 150 बळी गेले असून, 58 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच 153 व्यक्‍ती जखमी झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. यंदाच्या मान्सूनमध्ये देशभरातच अनेक दुर्घटना घडल्या असल्या तरी महाराष्ट्रात सर्वाधिक मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान झाल्याचे आपत्ती विभागातून सांगण्यात आले.

मृत्यूचा तपशील
वीज पडणे - 32
आग - 1
पूर - 3
पुरामुळे अपघात - 13
भिंत कोसळणे - 58
झाड पडणे - 3
विजेचा शॉक आणि अन्य अपघात - 40
एकूण - 150
एकूण जखमी - 153
जनावरांचा मृत्यू - 58
जखमी जनावरे - 2


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People Death in Rainy Season