जनतेचे प्रेम मिळत असल्याने ठिकठिकाणी होतेय गर्दी, CM शिंदेंचा दावा | Eknath Shinde In Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

जनतेचे प्रेम मिळत असल्याने ठिकठिकाणी होतेय गर्दी, CM शिंदेंचा दावा

औरंगाबाद : आम्हाला जनतेचे भरभरून प्रेम मिळत आहे. त्यामुळेच अशी असा प्रतिसाद व अशी गर्दी ठिकठिकाणी होत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता.१२) औरंगाबाद (Aurangabad) येथील विमानतळावर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली.

पैठण येथील जाहीर सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सोमवारी दुपारी दोन वाजे दरम्यान चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. (CM Eknath Shinde At Aurangabad)

त्यावेळी शिंदे बोलत होते. त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार ,अतुल सावे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, अधीक्षक मनीष कलवानिया उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, हा प्रतिसाद लोकांचा आशीर्वाद आणि लोकांचे प्रेम आहे. म्हणूनच मिळत आहेत असेही त्यांनी सांगितले. दरम्यान विमानतळावर दाखल झाल्यानंतर शिंदे यांना भेटण्यासाठी आलेल्या सर्वांची भेट व हस्तांदोलन करत कार्यकर्त्यांकडून होणारे सत्कार शिंदे यांनी स्वीकारले. यावेळी औरंगाबाद पोलिसांनीही मानवंदना दिली.