Akshay Kumar च्या हेअरड्रेसरचा मृत्यू; अभिनेता भावूक, म्हणाला...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar

Akshay Kumar च्या हेअरड्रेसरचा मृत्यू; अभिनेता भावूक, म्हणाला...!

Akshay Kumar Emotional Post On His Hairdresser : बाॅलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुःखी झाला आहे. सर्वांना हसवणारा अक्षय आज गप्प आहे. घटनाच अशी आहे ज्यामुळे त्याची अवस्था अशी झाली आहे. अक्षय कुमारचा हेअरड्रेसर जो गेल्या १५ वर्षांपासून त्याच्याबरोबर काम करत होता, त्याचे निधन झाले आहे. अभिनेत्याने आपला हेअरड्रेसर मिलन जाधवविषयी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा: Tina Datta : अभिनेत्री टीना दत्ताने विकल्या भाज्या, लोक मात्र हैरान

अक्षय कुमारने (Akshay Kumar) हेअरड्रेसर सोबतचा आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोत मिलन जाधव अभिनेत्याच्या केसाला वळण देत असल्याचा दिसत आहे. पोस्टमध्ये अक्षयने लिहिले, तू फंकी हेअरस्टाईल्स, हास्यामुळे गर्दीत वेगळा दिसायचा. नेहमी डोक्यात विचार असायचा की माझा एकही केस इकडे-तिकडे होऊ नये. (Bollywood News)

हेही वाचा: Brahmastra : पहिल्याच विकेण्डला 'ब्रह्मास्त्र'चं शतक, कमाई १०० कोटींपेक्षा अधिक

मिलन जाधव १५ वर्षांपेक्षा जास्त काळ माझा हेअरड्रेसर राहिला. आताही विश्वास होत नाही की तू आमच्या बरोबर नाही. मला तुझी नेहमी आठवण येत राहिल मिलानो. ओम शांती ! या पोस्टबरोबर अक्षयने हार्ट ब्रेकिंग इमोजीही टाकले. अक्षय कुमारच्या या पोस्टवर चाहते आणि सेलेब्स प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: Akshay Kumar Wirte Emotional Post After His Hairdresser Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..