पबजी खेळण्यास मनाई केल्याने भावाची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

आईच्या मोबाईलवर "पबजी' खेळण्यास मनाई केल्याने 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने मोठ्या भावाच्या पोटात कात्री भोसकून हत्या केली. भिवंडीतील शांतिनगर परिसरात शनिवारी (ता. 29) दुपारी 2.30 च्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. 

भिवंडी : आईच्या मोबाईलवर "पबजी' खेळण्यास मनाई केल्याने 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने मोठ्या भावाच्या पोटात कात्री भोसकून हत्या केली. भिवंडीतील शांतिनगर परिसरात शनिवारी (ता. 29) दुपारी 2.30 च्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. 

महंमद हुसैन महंमद अच्छे शाह (वय 19) असे मृताचे नाव आहे. शांतिनगर भागातील चौहान कॉलनीत महापालिका शाळा क्रमांक 70 नजीकच्या चाळीत शाह कुटुंबीय राहते. शनिवारी दुपारी त्याचा अल्पवयीन भाऊ आईचा मोबाईल घेऊन पबजी खेळत होता. हुसैनने त्यास मनाई करत मोबाईल हिसकावून घेतला. त्यामुळे दोघांत हाणामारी झाली. त्या वेळी रागाच्या भरात कात्री घेऊन अल्पवयीन भावाने हुसैनच्या पोटावर आणि छातीवर वार केले. यात हुसैन गंभीर जखमी झाला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Person Murdered his Brother