वेल्हा तालुक्‍यातील न्यायालयासाठी याचिका 

वेल्हा तालुक्‍यातील न्यायालयासाठी याचिका 

मुंबई - पुणे शहरालगत असलेल्या वेल्हा आणि मुळशी तालुक्‍यात न्यायालय सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. जागेअभावी तेथे न्यायालय सुरू करता येत नसल्यामुळे पक्षकारांना न्यायालयीन कामकाजासाठी पुण्यात शिवाजीनगर न्यायालयात यावे लागते. "न्याय आपल्या दारी' अशी सरकारची योजना असतानाही मुळशी आणि वेल्हा तालुक्‍यातील नागरिकांपासून ही योजना दूरच राहिली आहे, असा आरोप करत या तालुक्‍यात न्यायालय सुरू करावे, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

पुण्यातील मुळशी आणि वेल्हा या दुर्गम तालुक्‍यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून या तालुक्‍यांमध्ये औद्योगिकरणामुळे अनेक गृहप्रकल्प उभे केले आहेत. मुळशी तालुक्‍यातील पौड येथे आठवड्यातून एकदा दर मंगळवारी न्यायालय भरते. उर्वरित सहा दिवस पौड येथील न्यायालयाचे कामकाज पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयातून चालते; तर मुळशी तालुक्‍यातील माले येथे महिन्यातून एकदा ग्रामन्यायालय भरते. परंतु वेल्हा तालुक्‍यात न्यायालय नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी पुण्यात यावे लागते. या तालुक्‍यांमध्ये न्यायालय सुरू करण्यास उच्च न्यायालय अनुकूल आहे. मात्र, जागेअभावी तेथील न्यायालयांचा प्रश्न रखडलेला आहे असा आरोप याचिकेत केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com