Political Crisis: राष्ट्रवादी आणि शिवसेनेची याचिका वेगळी नाही, सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढताना काय सांगितलं?

अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्या, असे तोंडी आदेश आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती आहे.
Political Crisis
Political CrisisEsakal
Updated on

आमदार अपात्रतेच्या मुद्यावर विधानसभा अध्यक्षांकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या वेळापत्रकही बदलण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तर या प्रकरणी राष्ट्रवादीची केस सुनावणीसाठी घेतलीच नाही. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटावर कोणतेही ताशेरे ओढले नाहीत अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती.

त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी प्रकरणात दिलेला तोंडी आदेश समोर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले आहे. अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्या, असे तोंडी आदेश आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती आहे. विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या वेळापत्रकावर न्यायालय असमाधानी आहे. त्यांनी दोन्ही सुनावणीच्यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. ३० ऑक्टोबरपर्यंत योग्य वेळापत्रक द्या, नाहीतर कोर्टाला हस्तक्षेप करावे लागेल असा उल्लेख न्यायालयाने आदेशात केला आहे.

Political Crisis
Lalit Patil Drugs Case: ड्रग्ज माफिया ललित पाटीलला पाच दिवसांची पोलीस कोठडी!

दरम्यान याच्यामध्ये आत्तापर्यंत दावा केला जात होता की, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट)नेते जयंत पाटील यांनी दाखल केलेली याचिका वेगळी आहे आणि शिवसेना याचिका वेगळी आहे. कोर्टाने ही बाब नमूद केली आहे की, दोन्ही याचिका एकत्र आहेत.

सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी ही फक्त शिवसेनेबद्दल झाली. आमचे प्रकरण मंगळवारी ऐकू असे ओरली कोर्टाने सांगितलं. शिवसेना आणि राष्ट्रवादीची याचिका एकत्रित झाली आहे ही माहिती चुकीची आहे. आमचे वकील मुकूल रोहतगी हे कोर्टात होते. जर सुनावणी झाली असती तर ते काहीतरी बोलले असते असे सुनावणीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. त्यामुळे जो काही युक्तीवाद झाला तो शिवसेनेच्या प्रकरणात झाला आणि जी काही निरीक्षणे नोंदवण्यात आली ती देखील फक्त शिवसेनच्या प्रकरणातील आहेत, असेही पटेल म्हणाले होते.

Political Crisis
Rahul Gandhi on Adani: "इंडोनेशियामध्ये कोळसा विकत घेतात अन्..."; राहुल गांधींचा अदानींवर ३२ कोटींचा नवा आरोप

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या याचिका सुनावणीसाठी वेगवेगळ्या मांडण्यात आल्या होत्या. आमची १६ नंबरची केस होती आणि शिवसेनेची १९ नंबरची केस होती. आज फक्त १९ नंबरच्या केसवर सुनावणी झाली. दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत, त्याप्रमाणेच ही प्रकरणे वेगळ्या पद्धतीने पाहावी लागतील. आज प्रकरणावर सुनावणी झाली नाही हे महत्वाचं आहे असे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते.

दोन्ही प्रकरणे वेगळी असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच कोर्टाने ही बाब नमूद केली आहे की, दोन्ही याचिका एकत्र आहेत.

Political Crisis
Flyover Collapsed Video: थोडक्यात बचावले! मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुल अपघातात अजित पवार गटाच्या आमदाराला दुखापत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com