Lalit Patil Drugs Case: ड्रग्ज माफिया ललित पाटीलला पाच दिवसांची पोलीस कोठडी!

मुंबई पोलिसांनी चेन्नई इथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे.
Lalit Patil
Lalit Patil Esakal
Updated on

मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नईतून ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला आज अंधेरी सेशन्स कोर्टात दाखल केलं होतं. कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर त्याला सोमवारपर्यंत २३ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (Lalit Patil Drugs Case five days police custody by Andheri Sessions Court)

पाच दिवसांची पोलीस कोठडी

अॅड. अमित मिश्रा यांनी सांगितलं की, "आरोपीनं कोर्टासमोर सांगितलं की पुणे पोलिसांकडून त्याच्या जीवाला धोका आहे. आरोपीच्यावतीनं ज्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची विनंती केली. (Latest Marathi News)

पण साकीनाका पोलिसांच्यावतीनं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, "हे मोठं ड्रग्ज रॅकेट असून यामध्ये १२ आरोपी आहेत. यामध्ये बाराव्या आरोपीला अटक झाली आहे. या बाराव्या आरोपीनं पोलीस चौकशीत सांगितलं की, ड्रग्ज बनवण्यासाठीचा आपण कच्चा माल भूषण पाटील याच्या नाशिकमधील कारखान्याला पुरवत होतो. यामध्ये ललित पाटीलचा देखील समावेश असून तो रुग्णालयातून हे रॅकेट चालवत होता" (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत न्यायाधिशांनी ललित पाटीलला सोमवारपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.

Lalit Patil
Lalit Patil Drugs Case: "मी पळालो नाही, पळवण्यात आलं"; ललित पाटीलचा मीडियासमोर खळबळजनक आरोप

ललित पाटीलनं फेटाळले आरोप

आरोपीच्यावतीनं यावेळी कोणताही वकील नव्हता तेव्हा कोर्टानं लीगल एडच्या एका वकीलांमार्फत त्याला आपली बाजू मांडण्याची संधी दिली. यावेळी वकिलांमार्फत ललित पाटील यानं आपल्यावरील आरोप फेटाळले असून यामध्ये आपला कुठलाही हात नसल्याचं सांगितलं.

Lalit Patil
Lalit Patil Drugs Case: "मी पळालो नाही, पळवण्यात आलं"; ललित पाटीलचा मीडियासमोर खळबळजनक आरोप

सरकारी वकिलांनी मागितली पोलीस कोठडी

या प्रकरणात ललित पाटीलचा सहभाग असल्याचं पोलिसांना माहिती आहे. पण त्याला कच्चा माल कोण कोण पुरवत होतं, त्याचबरोबर इतरही कोणाचा यामध्ये सहभागाची शक्यता असल्यानं अधिक चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी विनंती सरकारी वकिलांनी केली ती कोर्टानं मान्य केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com