निर्दोष सुटलेल्या आरोपीची याचिका फेटाळली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

मुंबई - बलात्काराच्या आरोपाखाली सात वर्षे शिक्षा भोगल्यानंतर निर्दोष मुक्‍तता केलेल्या गोपाळ शेट्ये याला नुकसानभरपाई देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. पोलिस, दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाच्या चुकीमुळे आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया गेल्याने 100 कोटींची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी त्याने याचिका दाखल केली होती. गोपाळची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. 

कुर्ला रेल्वे पोलिसांनी औरंगाबादमधील एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गोपाळला अटक केली होती. त्यानंतर तीन दिवस त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. कुठल्या गुन्ह्यामुळे अटक करण्यात आली, हेसुद्धा सांगितले नव्हते. दंडाधिकारी आणि नंतर पुढे सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत गोपाळला बलात्कार केल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात त्याने अपील केले होते; मात्र अपील सुनावणीला येण्याआधीच त्याने ही शिक्षाही पूर्ण केली. 

उच्च न्यायालयाचे न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने पोलिसांचा माफीनाफा स्वीकारला; मात्र नुकसानभरपाईची मागणी नाकारत गोपाळची याचिका फेटाळली.

Web Title: Petition Rejected