‘पेट’ आता वेब बेस्‌ड! कॅमेऱ्यासमोरून दोनदा हलला किंवा नजर वळविल्यास विद्यार्थी होणार बाद; 474 जागांसाठी 3500 अर्ज, अर्जासाठी 22 जुलैपर्यंत मुदत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे ३० व ३१ जुलैला पीएच. डीपूर्व ‘पेट’ घेतली जाणार आहे. आतापर्यंत साडेतीन हजार जणांचे अर्ज विद्यापीठाकडे प्राप्त झाले आहेत. परीक्षा वेब-बेस्‌ड होणार असून, अर्जदारांना घरबसल्या ‘पेट’ देता येणार आहे.
solapur univercity
PhD Examinatiosakal

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे ३० व ३१ जुलैला 'पीएच. डी.'पूर्व ‘पेट’ घेतली जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत साडेतीन हजार जणांचे अर्ज विद्यापीठाकडे प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा वेब-बेस्‌ड होणार असून, अर्जदारांना घरबसल्या ‘पेट’ देता येणार आहे. मात्र, परीक्षेवेळी विद्यार्थी दोनवेळा त्या कॅमेऱ्यासमोरून हलला किंवा नजर दुसरीकडे केल्यास आपोआप ते लॉग-आऊट होणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बदलानुसार ‘नेट’ उत्तीर्णांना ‘पेट’मधून सवलत देण्यात आली आहे. ‘नेट’ व त्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या गुणांवरून (गुणवत्ता यादीनुसार) या उमेदवारांना 'पीएच.डी.'साठी प्रवेश मिळणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भविष्यात चार वर्षाची पदवी व एक वर्षाचे पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर देखील विद्यार्थ्यांना पेट देता येणार आहे. दरम्यान, यंदा पहिल्यांदाच कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने ‘पेट’ ऑनलाइन वेब बेस्‌ड पद्धतीने घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे यांच्या नेतृत्वाखाली ‘पेट’चे नियोजन सुरू आहे. परीक्षा पारदर्शक व्हावी, यासाठी विद्यापीठाने सर्वोतोपरी तयारी केली असून, प्रत्येक परीक्षार्थीचे परीक्षा काळातील एक तासाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. तसेच संगणकावर परीक्षा देताना विद्यार्थी हलला किंवा त्याची नजर दुसरीकडे गेल्यास तो बाद होणार आहे. याशिवाय त्याने परीक्षा कालावधीत संगणकावर दुसरी वेबसाईट उघडल्यास ते सुद्धा समजणार आहे. यासर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांना ‘पेट’ द्यावी लागणार आहे.

ठळक बाबी...

  • 'पीएच.डी.'च्या जवळपास ४७४ जागांसाठी आतापर्यंत साडेतीन हजार जणांनी केले अर्ज

  • ‘पेट’साठी २२ जुलैपर्यंत करता येणार विद्यार्थ्यांना अर्ज

  • एकाच विषयात परीक्षा देणाऱ्यांची ३० जुलैला तर दोन विषयात परीक्षा देणाऱ्यांची पेट ३१ जुलैला

  • 'पेट'पूर्वी २७ व २८ जुलै रोजी अर्जदाारांची मॉक टेस्ट (डेमो चाचणी) घेतली जाईल

  • 'पेट' उत्तीर्णांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर होणार मुलाखतीचा टप्पा

  • ‘पेट’चा पेपर एका तासातच सोडविणे विद्यार्थ्यांसाठी असणार बंधनकारक

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ‘पेट’ची तयारी पूर्ण

‘पीएच.डी.’पूर्व ‘पेट’ची तयारी अंतिम टप्प्यात असून विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी २२ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ‘पेट’पूर्वी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मॉक टेस्ट होईल. आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यात सोलापूरसह देश-विदेशातील विद्यार्थी आहेत.

- डॉ. श्रीकांत अंधारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com