esakal | शरद पवार यांच्यावर पीएच. डी. दहा जन्मांतही शक्‍य नाही - धनंजय मुंडे
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay-Munde

शरद पवार यांच्याबाबत पीएच. डी. करूनही पाटील यांना काही कळणार नाही. भाजप सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचे वारंवार दिसते आहे. ते सत्तेसाठी काय करू शकतात, हे लोकांना कळत आहे, तरीही भाजपचे नेते अफवा पसरवत आहेत. 
- धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री

शरद पवार यांच्यावर पीएच. डी. दहा जन्मांतही शक्‍य नाही - धनंजय मुंडे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरची पीएच. डी. दहा जन्मांतही शक्‍य नसल्याचे सांगत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला. पवार यांना समजून घेण्याचे पाटील यांचे काम नाही, असा टोलाही मुंडे यांना लगावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजकारणातील डावपेचांवरून पवार यांच्यावर पीएच. डी. करणार असल्याचे पाटील यांनी त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच सांगितले. पाटील यांच्या या नव्या अजेंड्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्‍वभूमीवर पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत (बार्टी) आलेल्या मुंडे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

डीएसके यांच्या सहा वाहनांचा लिलाव; 'या' वाहनाला मिळाली सर्वाधिक किंमत

मुंडे म्हणाले, ‘‘एल्गार परिषदेबाबत सत्याच्या बाजूने तपास होईल. महापोर्टल रद्द होणार आहे. मात्र, पर्यायी यंत्रणा उभी करावी लागणार आहे.’’

अमरावतीत ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त प्रेमविवाह न करण्याबाबत घेतलेल्या शपथेची चौकशी करणार आहोत, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

loading image