डीएसके यांच्या सहा वाहनांचा लिलाव; 'या' वाहनाला मिळाली सर्वाधिक किंमत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 February 2020

लिलाव सुरू झाल्यानंतर तासाभरातच पाच वाहनांचा लिलाव झाला. लिलावाच्या पहिल्या प्रक्रियेत नऊपैकी पाच वाहनांची विक्री झाली. त्यामुळे विक्री न झालेल्या वाहनांची खरेदी करता यावी म्हणून वाहन घेण्यासाठी आलेल्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली.  त्यात टोयोटा कंपनीच्या क्वालिस गाडीचा लिलाव झाला. 26 लाख 64 हजार रुपये किंमत असलेली ऑगस्टा कंपनीची दुचाकी देखील लिलावामध्ये ठेवण्यात आली होती. या दुचाकीवर मात्र कोणीही बोली लावली नाही.

पुणे : ठेवीदार आणि बँकांची देणे परत करता यावी म्हणून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या 9 पैकी सहा वाहनांचा शनिवारी लिलाव करण्यात आला. त्यात सर्वाधिक किंमत टोयाटो कंपनीच्या इनोव्हा या वाहनाला मिळाली. त्या वाहनाचा नऊ लाख 30 हजार रुपयांना लिलाव करण्यात आला. तर सर्वात कमी किंमत टोयाटो कंपनीच्या क्वालिस या चारचाकी वाहनास मिळाली. तिची तीन लाख पाच हजार रुपयांना विक्री झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मावळ प्रांत संदेश शिर्के यांनी ही प्रक्रिया पार पडली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. आय. शेख आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार यावेळी उपस्थित होते. 

पुणे : भाजप हा शिकणारा पक्ष : प्रकाश जावडेकर

लिलाव सुरू झाल्यानंतर तासाभरातच पाच वाहनांचा लिलाव झाला. लिलावाच्या पहिल्या प्रक्रियेत नऊपैकी पाच वाहनांची विक्री झाली. त्यामुळे विक्री न झालेल्या वाहनांची खरेदी करता यावी म्हणून वाहन घेण्यासाठी आलेल्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली.  त्यात टोयोटा कंपनीच्या क्वालिस गाडीचा लिलाव झाला. 26 लाख 64 हजार रुपये किंमत असलेली ऑगस्टा कंपनीची दुचाकी देखील लिलावामध्ये ठेवण्यात आली होती. या दुचाकीवर मात्र कोणीही बोली लावली नाही.

पुणे शहरात स्वाइन फ्लूचे नऊ रुग्ण

डीएसके यांच्या जप्त केलेल्या 20 पैकी 13 तेरा वाहनांचा आज लिलाव होणार होता. मात्र त्यातील आठ वाहनांच्या विक्रीवर डीएसके यांच्या वकिलांनी आक्षेप घेतल्याने त्यातील चार महागडी वाहने तूर्तास लिलावातून वगळण्यात यावी, असा आदेश बुधवारी न्यायालयाने दिला आहे. 

पुणे महापालिकेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूष करण्यासाठी काय घेतला निर्णय

स्थगिती दिलेल्या वाहनांमध्ये दोन बीएमडब्ल्यू, एक पोर्शे आणि टोयोटा कंपनीच्या एका वाहनाचा समावेश आहे. महागडी आणि नामांकित कंपन्यांची वाहने लिलावात न ठेवण्यात आल्याने खरेदी करण्यासाठी आलेल्यांमध्ये नाराजी होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DSK 6 vehicles were sold in auction today

Tags
टॉपिकस
Topic Tags: