'सीता स्वयंवर'चे जनक विष्णूदास भावे यांचा आज 118वा स्मृतीदिन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

भावे हे सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे यांचे चिरंजीव होते. विष्णुदास हे स्वतः हस्तकला कारागीर होते. लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. ते रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहु्ल्या वापरून करणार होते... 

महाराष्ट्राती नाट्यसंस्कृतीचे जनक विष्णूदास भावे यांची आज 118 वी पुण्यतिथी. त्यांनी 'सीता स्वयंवर' हे पहिले नाटक मराठी नाट्य-रंगभूमीला दिले. त्याचे अनेक प्रयोग त्यांनी केले. त्यानंतर अनेक नाट्यसंस्था महाराष्ट्रात उभ्या राहिल्या. भावे यांचे 9 ऑगस्ट 1901 मध्ये देहावसान झाले.

भावे हे सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे यांचे चिरंजीव होते. विष्णुदास हे स्वतः हस्तकला कारागीर होते. लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. ते रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहु्ल्या वापरून करणार होते. परंतु 1843 साली त्यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉल’मध्ये 5 नोव्हेंबर 1843 रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

पुढे नाट्यलेखन व निर्मिती करून विष्णुदास भावे यांनी अनेक ठिकाणी प्रयोग केले. 1853 मध्ये रोजी मुंबईला 'ग्रांट रोड थिएटर' येथे 'इंद्रजित वध' पहिला नाट्यप्रयोग केला. यानंतर विष्णुदास भावे यांनी 1861 पर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्या नाटकांचे प्रयोग केले. मात्र 1862 मध्ये त्‍यांनी आपला नाट्यव्यवसाय काही कारणाने बंद केला होता. राजा गोपीचंद हे नाटकही त्यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pioneer of Marathi Theater Vishnudas Bhave 118th Death Anniversary