तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे हाल! वेळेवर मानधन नसल्याने उदरनिर्वासाठी कोणी थोटले किराणा दुकान तर कोणी रोजंदारीवर

तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन जानेवारीपासून रखडले आहे. कधी महाविद्यालयांकडून वेळेवर बिले पाठविली जात नाहीत, तर कधी बजेट उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्या प्राध्यापकांना उदरनिर्वाहासाठी पर्यायी व्यवसाय करून संसाराचा गाडा हाकावा लागत आहे.
Professor
Professorsakal

सोलापूर : तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन जानेवारीपासून रखडले आहे. कधीही मानधन वेळेवर मिळत नसल्याने प्राध्यापकांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. कधी महाविद्यालयांकडून वेळेवर बिले पाठविली जात नाहीत, तर कधी बजेट उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्या प्राध्यापकांना उदरनिर्वाहासाठी पर्यायी व्यवसाय करून संसाराचा गाडा हाकावा लागत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कक्षेतील सर्व महाविद्यालयांना यापूर्वीच दर महिन्याला पाच तारखेपूर्वी या प्राध्यापकांची देयके पाठविण्याच्या सूचना विभागीय सहसंचालकांनी दिलेल्या आहेत. तरीही महाविद्यालयांकडून वेळेत बिले सादर न झाल्याने तर कधी बिले सादर झाली तरी बजेट नसल्याने वर्षभर कधीही महिन्याच्या महिन्याला मानधन मिळत नाही. यापूर्वी मार्चमध्ये जून ते जानेवारी या कालावधीतील मानधन देण्यात आले आहे. अजूनही जानेवारी महिन्यापासूनचे मानधन मिळण्याची वाट प्राध्यापकांना पाहावी लागत आहे.

ठळक बाबी

  • - दरवेळी मानधन मिळविण्यासाठी उच्च शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना करावे लागते खूश

  • - पदरमोड करून तासावर हजर रहा आणि मानधनासाठी क्लर्कसमोर जोडावे लागतात हात

  • - लाखात पगार असलेल्या प्राध्यापकांचे पगार वेळेवर, मात्र हजारातील मानधन नियमित नाही

  • - अनेक प्राध्यपकांनी महिन्यांचा खर्च भागविण्यासाठी निवडले इतर पर्याय

अर्धवेळ शिक्षकांचा उदरनिर्वाहासाठी पर्यायी खटाटोप

तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना नियमित तासांवर ये-जा कयासाठी इंधनासह उपजीविकेचा खर्च भागविण्यासाठी अनेक खटाटोप कराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे या प्राध्यापकांना प्रतिवर्षी नव्याने नियुक्त्या होत असल्याने कोणीही नावासह प्रतिक्रिया देत नाहीत. मात्र, नाव न छापण्याच्या अटीवर प्राध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार वेळेवर मानधन मिळत नसल्याने कोणी शेतीत काम करत आहेत तर कोणी दुकानदारी करत आहेत. काहीजण खासगी क्लासेस चालवत आहेत. वेळेवर न येणाऱ्या मानधनामुळे प्रपंचासाठी प्राध्यापकांना अनेक खटाटोप कराव्या लागत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com