पडळकरांच्या हत्येचा कट, पोलीस चित्रिकरणात व्यस्त; फडणवीसांचा गंभीर आरोप

"ज्यांचा ३०२ करायचा प्रयत्न केला त्यांच्यावर ३०७ कलम लावलं"
fadnvis
fadnvis

मुंबई : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padlkar) यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचा गंभीर आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केला आहे. पडळकरांच्या हल्ल्यावेळी पोलीस मोबाईलमध्ये शुटिंग करत होते असाही आरोप फडणवीस यांनी केला आहे. विधानसभेत (Assembly Winter session) या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना त्यांनी हा आरोप केला. (Plot to assassinate Padalkar Police engaged in filming Serious allegations of Fadnavis)

fadnvis
लसीकरण : १ जानेवारीपासून मुलांना CoWIN वर करता येणार नोंदणी

फडणवीस म्हणाले, फडणवीस म्हणाले, "पडळकर हयातच राहिले नसते. स्टेशन डायरीत एन्ट्री आहे की, पडळकरांच्या गाडीवर दगडफेक, काठीने हल्ला झाला. जमावातील लोक जखमी झाले. डंपरमध्ये दगड, काठ्या आहेत हे पोलिस डायरीत आहे. व्हिडिओतही जमावाच्या हातात काठ्या, रॉड दिसत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण पोलीस स्टेशनसमोर हा हल्ला झाला आहे. पोलीस स्टेशनच्या समोर अडीचशे लोकं, सोडा वॉटरच्या बाटल्या, दगड, काठ्या घेऊन तयार होते. पण पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही तर गोपीचंद पडळकर येईपर्यंत वाट बघत बसले. या हल्ल्याची क्लिप पाहिली तर पोलीसच शूटिंग करताना दिसत आहेत. ज्यांनी कारवाई करायची ते शूटिंग करत होते. गोपीचंद पडळकरांची गाडी निघून गेल्यावर त्यांच्याच विरोधात तक्रार दाखल करण्यात आलीए. ज्याचा ३०२ करायचा प्रयत्न त्याच्यावरच पोलिसांनी ३०७ कलम लावले. मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई होत नाही पण विरोधकांना जीवनातून उठवायचा प्रयत्न होत असेल तर हे दुर्दैवी आहे. ज्या व्यक्तीनं हे केलं त्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतचे फोटो आहेत, असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

fadnvis
नितेश राणेंची दुहेरी कोंडी, 12 उच्चस्तरीय पोलीस अधिकारी कणकवलीत दाखल

"हत्येचा कट रचत असतील तर काम कसं करायचं? मुंडे साहेब पवार साहेबांवर आरोप करायचे तेव्हा मुंडेंना सुरक्षा दिली गेली. पण गोपीचंद पडळकर संपला पाहिजे अशी अवस्था असेल तर हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. पडळकरांवर कलम ३०७ लावलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. वरिष्ठ पोलिसांची बदली करायला हवी अन्यथा आम्ही सभागृहात मोकळेपणानं आणि न घाबरता काम करू शकणार नाही," असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

पडळकरांनी काय केला होता आरोप?

गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र पोलिसांचा बॅाडीगार्ड नाकारला आहे. तसंच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, पवार कुटुंबीय आणि सांगली पोलीस अधीक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. ७ नोव्हेंबर रोजी माझ्या हत्येच्या कटात हेच सामील होते, असा आरोप पडळकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. महाराष्ट्र पोलिसांचा बॉडीगार्ड नाकारताना पडळकर म्हणाले, रक्षकच जर भक्षक बनत असतील तर यांच संरक्षण घ्यायचं कशाला?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com