मोदींनी केले शिवस्मारकाचे भूमिपूजन

वृत्तसंस्था
शनिवार, 24 डिसेंबर 2016

मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन आणि भूमिपूजन केले. यावेळी महाराष्ट्रतील विविध ठिकाणांहून आणलेले माती आणि जल स्मारकस्थळी जहाजाने जाऊन मोदी यांनी समुद्रात अर्पण केले.

निवडक निमंत्रितांसोबत मोदी स्मारकस्थळी जहाजाने पोचले आणि तेथे त्यांनी जल-माती अर्पण केली. यावेळी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प 3 हजार 600 कोटींचा आहे. समुद्रामध्ये 15 हेक्‍टर जागेत हे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.

आज मोदी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत.

Web Title: PM Narendra Modi performs Jal Pujan for Chhatrapati Shivaji memorial in Mumbai