Congress : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा पराभव करु; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी मोदींनी गुजरातच्या हिताचे आणि महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय घेतले.'

Congress : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा पराभव करु; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

सातारा : केंद्रीय निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) निवडणूक आयोगासह (Election Commission) इतर संस्थाही काबीज केल्या आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलाय. साताऱ्यातील काँग्रेस कमिटीत (Congress Committee) पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी चव्हाण बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, राजेंद्र शेलार, नरेश देसाई, उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'लोकशाहीच्या संस्थेमध्ये सुप्रीम कोर्टही आहे, त्याच्यावरही नियंत्रण असल्यामुळं हा चर्चेचा विषय आहे. सरकार म्हणून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय. मात्र, त्यांनी आता काम करावीत. सरकारकडून सध्या महाराष्ट्रावर अन्याय होणारे निर्णय घेतले जात आहेत.'

हेही वाचा: Rishi Sunak : 'जावई होणार यूकेचे पंतप्रधान'; इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींनी दिली खास प्रतिक्रिया

ईडीच्या तावडीतून सुटण्यासाठी डबल इंजिनचं सरकार

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना चव्हाण म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का नाही, असा प्रश्न आहे. कारण, पंतप्रधानांनाच अशा संस्थांच्या नेमणुकीचे अधिकार आहेत. राज्यातील सरकार तर तात्पुरती व्यवस्था आहे. ईडीच्या तावडीतून सुटण्यासाठी हे डबल इंजिनचे सरकार आहे. याचा फटका राज्याला बसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार घालविण्यासाठी काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होते, त्यावेळी नरेंद्र मोदींनी गुजरातच्या हिताचे आणि महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय घेतले. त्याला फडणवीसांची मुखसंमती असल्याचा आरोपही माजी मुख्यमंत्र्यांनी केलाय.

हेही वाचा: UK PM : ऋषी सुनक PM होताच मेहबूबा मुफ्तींचं ट्विट; भाजप चांगलंच भडकलं, म्हणालं.. 'तुम्ही अल्पसंख्याक'

काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार

22 वर्षांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली. आता मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून आता काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार आहेत. राहुल गांधी यांचीही ‘भारत जोडो’ पदयात्रा सुरू आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करून लोकशाही टिकवण्याचं काम राहुल गांधींची ही ‘भारत जोडो’ यात्रा करेल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.