
अलिबाग : गोपाळकाला अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून यासाठी संपूर्ण जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी आकर्षक मातीची मडकी विकण्यास आली आहेत. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्ष आणि मंडळानी दहीहंडी स्पर्धांचे आयोजन केले आहे. रायगड जिल्ह्यात यावर्षी एक हजार ९१७ सार्वजनिक तर तब्बल सात हजार ०६२ खासगी दहीहंडी फोडण्यात येणार आहेत. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासनानेही तगडा बंदोबस्त ठेवला आहे.