ब्रेकिंग! पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर’; आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वी डॉक्टरांनी रूग्णालयातील ‘या’ व्यक्तीला केले 2 कॉल

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला आता ७३ दिवस झाले आहेत. पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अटकेतील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांना जामीन मिळाला. युक्तिवादावेळी मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी डॉक्टरांच्या मोबाईलच्या ‘सीडीआर’चा मुद्दा उचलला होता.
Solapur neurosurgeon Dr. Shirish Valsangkar’s suicide case
Solapur neurosurgeon Dr. Shirish Valsangkar’s suicide caseesakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला आता ७३ दिवस झाले आहेत. पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अटकेतील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांना जामीन मिळाला. युक्तिवादावेळी मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी डॉक्टरांच्या मोबाईलच्या ‘सीडीआर’चा मुद्दा उचलला होता. त्यानुसार पोलिसांनी तो ‘सीडीआर’ न्यायालयात सादर केले आहे.

डॉ. वळसंगकरांनी २०२२ ते २०२४ या काळात स्वत:च्या रुग्णालयाचा कारभार सोडला आणि डिसेंबर २०२४ पासून पुन्हा रुग्णालयाचा कारभार स्वत:कडे घेतला आणि ओपीडी पाहू लागले. दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांच्या एका असिस्टंटने ‘१५ एप्रिल २०२५ पासून डॉक्टरांनी नियमित ओपीडी सुरू केली. त्याबद्दल डॉक्टरांनी मला कॉल करून सांगितले. त्यांनतर मी नियमित रुग्णालयात येऊ लागले. १८ एप्रिलला डॉक्टर ओपीडीत आले, त्यावेळी टेन्शनमध्ये दिसले. त्यावेळी त्यांनी मनीषाने आत्महत्येची धमकी दिल्याने टेन्शनमध्ये असून काय करावे? मला सुचत नसल्याचे सांगितले. तेव्हा तुम्ही शांत रहा, आपण काहीतरी मार्ग काढू, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर ते दुपारी १२ वाजता घरी गेले. त्या दिवशी मी घरी असताना रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास डॉक्टरांना ओपीडीसंदर्भात फोन लावला. त्यावेळी ते अतिशय तणावात वाटले, मनीषामुळे मी खूप दु:खी आहे, मी आतापर्यंत कमावलेली इज्जत धुळीला मिळवेल म्हणून तिने धमकी दिली आहे, असे म्हणून त्यांनी कॉल कट केला. काहीवेळाने डॉक्टरांनी पुन्हा कॉल केला. त्यावेळी त्यांना काय झाले विचारल्यावर मी जास्त बोलू शकत नाही म्हणून त्यांनी फोन कट केला.

थोड्यावेळाने त्यांनी पुन्हा कॉल केला आणि मी आता बोलण्याच्या स्थितीत नाही असे सांगून काहीवेळ थांबून फोन कट केला. त्यानंतर रात्री नऊ वाजता त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळाली’ असा जबाब पोलिसांना दिला आहे. हाच मुद्दा उचलून धरत ॲड. नवगिरे यांनी त्या कॉलमध्ये नेमके काय बोलणे झाले, असा प्रश्न उपस्थित करीत डॉक्टरांच्या ‘सीडीआर’ची मागणी केली होती. डॉक्टरांनी आत्महत्येपूर्वी मुलगा डॉ. अश्विन यांना भेटून व फोनवरून देखील आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. तरीपण, डॉ. शिरीष यांनी आत्महत्येपूर्वी कोणाला कॉल केले?, त्यांना कोणाचे कॉल आले व त्यांच्यात काय बोलणे झाले?, यासंदर्भातील ‘सीडीआर’ न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात का जोडले नाहीत?, असाही प्रश्न ॲड. नवगिरे यांनी उपस्थित केला होता. आता पोलिसांनी डॉ. वळसंगकरांचे एक महिन्याचे सीडीआर न्यायालयास सादर केले आहेत.

मोबाईलला रेकॉर्डिंग नव्हते, पोलिसांसमोर आव्हान

डॉ. शिरीष यांच्याकडील महागड्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा नव्हती. त्यामुळे आत्महत्येच्या दिवशी किंवा तीन-चार दिवस अगोदर डॉक्टरांना कोणाकोणाचे कॉल आले, त्यांनी कोणाकोणाला कॉल केले, त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, या प्रश्नांचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. त्यातून त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर येईल, असा विश्वास त्यांच्या निकटवर्तीय मित्रांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com