पोलिस भरती ठरली, पण नव्या पोलिस ठाण्यांचा निर्णय होईना! सोलापुरातील १७ ठाण्यांसह राज्यभरातील शेकडो प्रस्ताव 'गृह'कडे धुळखात; गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने अंमलदारांवर तपासाचे ओझे

सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांची हद्द १९९२ रोजी स्वतंत्र झाली. सध्या जिल्ह्याची लोकसंख्या अर्ध्या कोटींहून अधिक झाली असून दरवर्षी शहरात दोन हजारांवर आणि ग्रामीणमध्ये चार हजारांवर गुन्ह्यांची नोंद होते. हद्द आणि लोकसंख्या वाढल्याने ग्रामीण पोलिसांनी नव्या ११ पोलिस ठाण्यांचा तर शहर पोलिसांनी एका पोलिस ठाण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला आहे.
Devendra Fadanvis News
CM Devendra Fadanvis sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांची हद्द १९९२ रोजी स्वतंत्र झाली. सध्या जिल्ह्याची लोकसंख्या अर्ध्या कोटींहून अधिक झाली असून दरवर्षी शहरात दोन हजारांवर आणि ग्रामीणमध्ये चार हजारांवर गुन्ह्यांची नोंद होते. हद्द आणि लोकसंख्या वाढल्याने ग्रामीण पोलिसांनी नव्या ११ पोलिस ठाण्यांचा तर शहर पोलिसांनी एका पोलिस ठाण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला आहे. मात्र, त्यावर अजूनपर्यंत निर्णय झाला नसून नव्या पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव लालफितीत अडकले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात चोरी, घरफोडी, खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, कौटुंबिक छळ, वाळू तस्करी, अवैध हातभट्टीची निर्मिती विक्री, जुगार-मटका अशा गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. तरीदेखील, सोलापूर जिल्ह्यात ग्रामीणमध्ये सध्या २५ पोलिस ठाणी असून शहरात सात पोलिस ठाणी आहेत. शहर-ग्रामीणची हद्द मात्र खूपच वाढली, तरी पोलिसांचे मनुष्यबळ कमीच आहे. ५० लाख लोकसंख्येचा भार अवघ्या साडेपाच-सहा हजार पोलिसांवर आहे. त्यामुळे एका अंमलदारास दरमहा सरासरी १५ गुन्ह्यांचा तपास तपास करावा लागतो, त्यात पुन्हा सण-उत्सव, नेत्यांचे दौरे यातील बंदोबस्त असतो.

या पार्श्वभूमीवर गुन्ह्यांचा तपास वेळेवर आणि व्यवस्थित करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे गृह विभागाने नव्या पोलिस ठाण्यांना मान्यता दिल्यास हा त्रास कमी होऊन गुन्ह्यांचे प्रमाण देखील आटोक्यात आणण्यास मदत होईल, असा विश्वास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ग्रामीणमध्ये ‘या’ १६ नव्या ठाण्यांचा प्रस्ताव

मंगळवेढा पोलिस ठाण्याअंतर्गत नंदेश्वर, मोहोळ पोलिस ठाण्याअंतर्गत शेटफळ, करमाळ्याअंतर्गत जेऊर व जिंती, सांगोला पोलिस ठाण्याअंतर्गत हतीद व महूद, अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याअंतर्गत करजगी, अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याअंतर्गत शिरवळ, वळसंग पोलिस ठाण्याअंतर्गत रे नगर, अकलूजअंतर्गत श्रीपूर व सोलापूर तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत चिंचोली एमआयडीसी अशा ११ ठिकाणी नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविण्यात आला आहे. शहर पोलिसांनीही एमआयडीसी व विजापूर नाका पोलिस ठाण्यातून विमानतळ पोलिस ठाणे स्वतंत्र असावे, असा प्रस्ताव पाठवूनही त्यावर निर्णय झालेला नाही, हे विशेष.

दरवर्षी ६०० हून अधिक अपघाती मृत्यू, तरी...

सोलापूर शहर-जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ६०० हून अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. रस्ते अपघात व अपघाती मृत्यूमध्ये सोलापूर जिल्हा नेहमीच राज्यातील सर्वाधिक अपघातांच्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या दहामध्ये आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी मोहोळ शहर, बार्शी शहर, अक्कलकोट उत्तर, पंढरपूर शहर, अकलूज शहर या ठिकाणी नव्या वाहतूक पोलिस ठाण्यांसाठी प्रस्ताव गृह विभागाला पाठविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com