.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Sakal
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सार्वजनिक केलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेत शिवसेनेने एक पाऊल मागे घेतले. आरोप-प्रत्यारोप बंद करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काम करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पक्षाचे मंत्री, आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांना दिले.