Sharad Ponkshe : 'देश हिंदू राष्ट्र होईल, तेव्हाच सावरकरांचं स्वप्न पूर्ण होईल'; काँग्रेसवर टीका करत पोंक्षेंचं मोठं विधान

'सावरकरांनी काँग्रेसचे हिंदुत्व स्वीकारले नाही, त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यावेळी काँग्रेसला विरोध केला'
Swatantraveer Savarkar Actor Sharad Ponkshe
Swatantraveer Savarkar Actor Sharad Ponkshe esakal
Updated on
Summary

केवळ व्याख्यान ऐकून उपयोग होणार नाही, तर सावरकरांच्या प्रखर विचारांचा घरोघरी प्रचार-प्रसार आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

निपाणी : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व हेच खरे राष्ट्रीयत्व होते, असे मनावर कोरले गेले पाहिजे. देश हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) होईल, तेव्हाच सावरकरांचे स्वप्न पूर्ण होईल, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी व्यक्त केले.

५० वर्षांहून अधिक काळ स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांची खासकरून काँग्रेस सरकारच्या काळात बदनामी करण्यात आली. हिंदू धर्मावर आघात करण्याचे राजकारण सुरू आहे, म्हणून सावरकर डोळसपणे सातत्याने वाचले पाहिजेत, असे आवाहनही पोंक्षे यांनी केले.

Swatantraveer Savarkar Actor Sharad Ponkshe
NCP Crisis : 15 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचा मोठा गट अजितदादांसोबत जाणार? जयंत पाटलांचंही नाव चर्चेत

येथील गांधी चौकातील व्यंकटेश मंदिरात निपाणी भाग ब्राह्मण सभेच्या वतीने अधिक मासनिमित्त आयोजित महारुद्र स्वाहाकार कार्यक्रमात ते बोलत होते. 'स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन" असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रथम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.

Swatantraveer Savarkar Actor Sharad Ponkshe
Loksabha Election : मंत्रीपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसचा 'हा' बडा नेता निवडणूक लढवणार? जारकीहोळी म्हणाले, हायकमांडनं मला..

पोंक्षे म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात सावरकरांची बदनामी करण्यात आली. मात्र, सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही. सावरकरांनी काँग्रेसचे हिंदुत्व स्वीकारले नाही, स्वातंत्र्यलढ्यावेळी काँग्रेसला विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही सावरकरांचा सतत अपमान होत राहिला.

Swatantraveer Savarkar Actor Sharad Ponkshe
Adv Ujjwal Nikam : 'पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकार जयंत पाटलांनाच, गटनेत्यालाच आपल्याकडं वळवण्याची रणनीती'

केवळ दीड, दोन तासांत सावरकर कळणार नाहीत. त्यासाठी सतत सावरकर वाचत रहावे लागेल. केवळ व्याख्यान ऐकून उपयोग होणार नाही, तर सावरकरांच्या प्रखर विचारांचा घरोघरी प्रचार-प्रसार आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Special MP-MLA Court Proceedings: Adv. Milind Pawar Interrogates Satyaki Savarkar
Usha Chati memories of Veer Savarkar
Sangli Vishrambag Savarkar statue issue
Savarkar Defamation Case: Satyaki Savarkar Files Plea for Arrest Warrants Against Global Entities
Marathi News Esakal
www.esakal.com