
Sujay Vikhe: राजकीय व्यक्ती आर्थिक सक्षम असली तरच ती चांगल्या प्रकारे विकासकामं करु शकते, असं विधान माजी खासदार सुजय विखे यांनी केलं आहे. यामागं त्यांनी आपल सविस्तर मत मांडलं आहे. त्याचबरोबर कोविडच्या काळात खासगी विमानाचा वापर केल्यानं वादाच्या भोवऱ्याच्या आणि न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यानं त्यामागची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. सरकारनामाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखातीत ते बोलत होते.