महाराष्ट्रातील राजकीय स्कँडल : हवाई सुंदरीला छेडल्याने राजीनामा द्यावा लागलेले उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांच्यावर महिलेला छेडल्याचा आरोप झाला होता.
महाराष्ट्रातील राजकीय स्कँडल : हवाई सुंदरीला छेडल्याने राजीनामा द्यावा लागलेले उपमुख्यमंत्री

मुंबई : शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हलत नाही असं म्हणतात. पण गेल्या दोन-तीन वर्षांत राज्यात अनेक नेत्यांवर त्यांच्या चारित्र्यावर जोरदार आरोपसत्र सुरु झालंय. माजी वनमंत्री संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यापासून ते माजी आमदार विजय शिवतरे, सेना नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchick) यांच्यापर्यंत कित्येक जणांवर अनैतिक प्रेमसंबंधांचे आरोप झाले.

महाराष्ट्रातील राजकीय स्कँडल : हवाई सुंदरीला छेडल्याने राजीनामा द्यावा लागलेले उपमुख्यमंत्री
Video: रघुनाथ कुचिक याला अटक व्हायला हवी- चित्रा वाघ

सध्या भाजप नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांचं लैंगिक शोषणाचं प्रकरण गाजत आहे. या आरोपांचा खरेखोटेपणा अजून सिद्ध झालेला नसला तरी हे आरोप महाराष्ट्रातील राजकारणाच्या नैतिकतेचा घसरता आलेख दाखवत आहेत. स्वच्छ चारित्र्य ही एकेकाळच्या राजकारणाची ओळख असली तरी पूर्वीदेखील अशा काही घटना घडून गेल्या होत्या. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अशाच काही गाजलेल्या पॉलिटिकल स्कॅन्डलबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील राजकीय स्कँडल : हवाई सुंदरीला छेडल्याने राजीनामा द्यावा लागलेले उपमुख्यमंत्री
आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, बलात्काराचा गुन्हा दाखल

१९८०च्या दशकात महाराष्ट्रात असंच एक वादळ निर्माण झालं होतं. यात तत्कालीन उपमुख्यमंत्री रामराव आदिक (Ramrav Aadik) यांच्यावर महिलेला छेडल्याचा आरोप झाला होता. ही घटना आहे १९८४ सालची. त्यावेळी वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते बॅरिस्टर रामराव आदिक उपमुख्यमंत्री होते. रामराव आदिक म्हणजे काँग्रेसमधील मोठं प्रस्थ. ते मोठे कायदेतज्ज्ञ होते. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल, राज्य विधी आयोगाचे अध्यक्ष, शासनाचे मानद कायदे सल्लागार अशी जबाबदारीची पदे त्यांनी सांभाळली होती. १९८३ साली उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्याआधी त्यांच्याकडे पाटबंधारे, समाजकल्याण, आदिवासी कल्याण, विधी व न्याय अश्या महत्वाच्या खात्याचं मंत्रिपद होतं. गांधी घराण्याशी त्यांची जवळीक सर्वश्रुत होती. राज्य सरकारमध्ये मात्र मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांशी त्यांचे अनेकदा खटके उडायचे.

महाराष्ट्रातील राजकीय स्कँडल : हवाई सुंदरीला छेडल्याने राजीनामा द्यावा लागलेले उपमुख्यमंत्री
निवृत्त अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

उपमुख्यमंत्री असताना रामराव आदिक एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते. जर्मनीच्या हॅनोव्हर या शहरात त्यांना प्रदर्शनासाठी जायचं होतं. जातानाच्या प्रवासादरम्यान विमानात त्यांनी मद्यप्राशन केलं. आदिक यांना भानच राहिलं नाही. त्यामुळे त्यांनी एका हवाई सुंदरीला नकोसा स्पर्श करत असभ्य वर्तन केलं. ती हवाई सेविका घाबरून गेली. तिने या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली नाही. पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने ही घटना महाराष्ट्रात पोहचलीच. पुढे टाइम्स ऑफ इंडियाने हे प्रकरण बाहेर काढलं. इतर वृत्तपत्रांनीही ते लावून धरलं. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आदिकांची तोंडदेखली पाठराखण केली. या प्रकरणावर सविस्तर निवेदन करू असं आश्वासन त्यांनी विधानसभेत दिलं; मात्र त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ नेत्या शालीनीताई पाटील यांनी जाहीर सभेत आदिकांच्या वर्तनावर टीका केली. त्यानंतरही आदिकांनी काही राजीनामा देण्याची तयारी दाखवली नाही.

महाराष्ट्रातील राजकीय स्कँडल : हवाई सुंदरीला छेडल्याने राजीनामा द्यावा लागलेले उपमुख्यमंत्री
जनसंपर्क अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

चहुबाजूंनी वृत्तपत्रांचा दबाव वाढू लागला होता. हॅनोव्हरला जाऊनही प्रदर्शनाला गेलेच नाहीत कारण ते जाण्याच्या स्थितीतच नव्हते असंही स्पष्ट झालं. एकूणच आदिक यांनी आपल्या बेफिकीर वागण्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळवून दिलं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं. वृत्तपत्रांमध्ये अग्रलेख येऊ लागले. दबाव वाढू लागला. शेवटी रामराम आदिक यांना राजीनामा द्यावाच लागला. त्यासोबत आपण दारू सोडत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. विमानात जे मद्य दिलं होतं ते भेसळयुक्त असल्यामुळे आपल्याला त्रास झाल्याचं स्पष्टीकरण आदिक यांनी दिलं. त्यावरूनही त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

रामराव आदिक या घटनेनंतर राजकीय विजनवासात गेले. आपली संपूर्ण कारकीर्द एक कार्यक्षम मंत्री, कायद्याचा अभ्यास असणारा एक दिग्गज नेता म्हणून गाजवणाऱ्या आदिकांची पुढच्या पिढयांना ओळख एका हवाई सुंदरीची छेड काढली म्हणून राजीनामा द्यावा लागलेला मुख्यमंत्री अशी उरली.

संदर्भ - इंडिया टुडे, दैनिक लोकमत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com