'अजितदादा, वुई लव्ह यू'; कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी

टीम ई-सकाळ
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

- अजित पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी सुरु

मुंबई : राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार पोस्टरबाजी केली. 'अजितदादा, वुई लव्ह यू' अशा आशयाचे पोस्टर हातात घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आता अजित पवार यांचे महाविकासआघाडीत 'कमबॅक' होणार असल्याचे सांगितले जात आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. 

त्यानंतर आता अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कार्यकर्त्यांकडून त्यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी केली जात आहे. त्यामध्ये 'अजितदादा, वुई लव्ह यू', 'एकच वादा अजितदादा' अशा स्वरूपाचे पोस्टरही दिसत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Posters Display Supporting Ajit Pawar