esakal | राज्यातील आरोग्यसेविकांना दिलासा! केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

health workers

आरोग्यसेविकांची पदे कायम; केंद्र सरकारचा निर्णय

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : देशात २०२१-२२ मधील प्रकल्प अंमलबजावणी आरोग्यसेविकांची (health workers) पदे रद्द केली जाणार नाहीत. ती कायम राहणार आहेत, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharati Pawar) यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील ५९७ आरोग्यसेविकांना दिलासा मिळाला आहे. शहरी भागात काम करणे शक्य आहे, अशा ग्रामीणमधील आरोग्यसेविकांना शहरी भागात रुजू करून घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: राज ठाकरे पुन्हा नाशिकच्या मैदानात! कृष्णकुंजवर बैठक

डॉ. भारती पवार - ग्रामीणमधून शहरात रुजू करणार

आरोग्यसेविकांना ज्यांना सध्याच्या ठिकाणी ठेवणे शक्य आहे, त्यांना तिथेच कामावर ठेवले जाणार आहे. उरलेल्या आरोग्यसेविकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इतर ठिकाणी रिक्त जागांवरील कामांवर रुजू करून घेण्यात येईल, असे सांगून डॉ. पवार म्हणाल्या, की केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविकांची पदे रद्द होणार नाहीत. त्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा: रेल्वेचा प्रवास ठरतोय असुरक्षित! गुन्हेगारीत वाढ

loading image
go to top