Prakash Ambedkar: लोकसभा निवडणुकीत वंचितला किती जागा मिळणार?, प्रकाश आंबेडकरांनी आकडा सांगत केली भविष्यवाणी

Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडी (VBA) ने महाविकास आघाडीशी वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रात एकट्याने लोकसभा निवडणूक लढवली.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkaresakal

Prakash Ambedkar:

महाराष्ट्रात लोसकभा निवडणुकीत ४८ जागांसाठी मतदान पार पडले. महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित आघाडी राज्यात मैदानात होती. महाविकास आघाडी आणि वंचितची चर्चा फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर उमेदवार दिले होते. त्यामुळे वंचितला या निवडणुकीत फायदा होणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ४८ जागांसाठी झालेली लढाई जिकरीची होती. महाविकास आघाडी किंवा महायुती जिंकली तरी फार मोठे मताधिक्क मिळणार नाही. आम्ही लढवलेल्या ३८ जागांपैकी तीन जागा आम्ही जिंकत आहोत. तर आमच्या मतांची टक्केवारी २०१९ पेक्षा ६.७५ टक्क्यांनी वाढेल. 

प्रकाश आंबेडकर यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. मोदींनी लोकसभा निवडणुकांचे ग्रामपंचायत निवडणुकीत रुपांतर केले. त्यांनी वैयक्तिक हल्ले केले. तसेच त्यांनी वापरलेली भाषा घृणास्पद होती. मोदींनी पंतप्रधानपदाचा दर्जा खाली आणला आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

यापूर्वी देखील अनेक पंतप्रधानांनी प्रचार केला पण मोदींनी जवळपास प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचार केला. विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील ते असेच करतात, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

Prakash Ambedkar
Nandurbar Lok Sabha Constituency : सर्वाधिक मतदान कोणाच्या पत्थ्यावर पडणार? पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारांत तर्कवितर्कांना उधाण

देशभरातली प्रादेशिक पक्ष चांगली कामगिरी करतील. त्यामुळे भाजपला फटका बसणार आहे. आणखी दोन टप्पे असल्याने आकड्यांचा अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही. मात्र भाजपच्या ४०० पार मिशनला फटका बसणार आहे. 

भाजपच्या विरोधात मतांचे एकत्रिकरण पाहून समाजातील सदस्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही हे दिसून आले. दलित भाजपला पुन्हा पाठीशी घालणार नाहीत. त्यांना संघाची विचारधारा आणि हिंदु राष्ट्राची कल्पना याविषयी भीती वाटत होती. मोदींच्या विकासाच्या फळीबद्दलही त्यांचा भ्रमनिरास झाल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar
Loksabha Election: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 1996 नंतर पहिल्यांदाच 'इतके' हजार उमेदवार मैदानात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com