
देशात संध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. ही निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आहे. आता 25 मे आणि 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील जागांवर मतदान होणार आहे.
दरम्यान, यंदाच्या म्हणजेत 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी देशभरातून एकूण 8,360 उमेदवार मैदानात उतरले आहेत. म्हणजेच एका जागेवर सरासरी 15 उमेदवार उभे आहेत. 1996 नंतर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची ही सर्वाधिक संख्या आहे. यापूर्वी 1996 मध्ये लोकसभेच्या 543 जागांसाठी सर्वाधिक 13,952 उमेदवार रिंगणात होते.
आतापर्यंत यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, जर आपण सर्व सात टप्प्यांतील उमेदवारांची संख्या पाहिली तर 13 मे रोजी झालेल्या चौथ्या टप्प्यातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक 1,717 होती. या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी मतदान झाले.
पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी 1,625 उमेदवार, दुसऱ्या टप्प्यात 89 जागांसाठी 1,198 उमेदवार, तिसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी 1,352 उमेदवार आणि पाचव्या टप्प्यात 49 जागांसाठी 695 उमेदवार रिंगणात होते. आगामी सहाव्या टप्प्यासाठी ८६९ उमेदवार रिंगणात आहेत.
सर्व राजकीय पक्ष महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारत असतात. पण महिलांना संधी देण्याची वेळ येते तेव्हा सर्वच पक्ष मागे सरकतात. कारण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 10% पेक्षा कमी महिला उमेदवार आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) नुसार, 8337 उमेदवारांपैकी फक्त 797 महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणूक लढवणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी हा आकडा केवळ ९.५% आहे.
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यासाठी महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. मात्र, महिला आरक्षण कायदा अद्याप लागू झालेला नाही.
गेल्या दिड महिन्यांपासून देशात लोकसभा निवडणुकीचा धुरळा उठला आहे. सर्वच राजकीय पक्ष बाजी मारण्यासाठी प्रयत्न करत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या निवडणुकीत 400 जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवत निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे.
दुसरीकडे देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना करत भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांनीही जोरदार प्रचार करत भाजपला सत्तेतून हटवणार असल्याचे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.