संभाजी भिडे हे हिंदुंमधले हफीझ सईद: प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नागपूर - शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे हिंदुंमधील हफीझ सईद असल्याची टीका ज्येष्ठ राजकीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज (मंगळवार) केली.

नागपूर - शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे हिंदुंमधील हफीझ सईद असल्याची टीका ज्येष्ठ राजकीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज (मंगळवार) केली.

कोरेगाव भीमा येथे गेल्या 1 जानेवारी रोजी उसळलेल्या हिंसाचारामध्ये भिडे व हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांचा सहभाग असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज त्यांनी पुन्हा एकदा भिडे यांना लक्ष्य केले.
आंबेडकर म्हणाले -

  • हिंदू संघटनांमधील कट्टरपणा वाढत चालला आहे .हिंदुंमध्ये हफिज सईद जन्माला येत आहेत आणि सरकार यावर काहीही नियंत्रण आणू शकत नाही.
  • संभाजी भिडे सारखे हफिज सईद अनेक राज्यात आहेत. हे हाफिज सईद एकत्र झाले का, याचा शोध घ्यावा. काही संघटना राज्यात हिंदुत्वाचा अजेंडा राबवित आहेत
  • शासनाने भिडे गुरुजी आणि एकबोटे यांना लवकरात लवकर अटक करावी. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, त्यामुळे सरकारने कारवाई करावी.
  • आम्ही पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनच्या विरोधात न्यायालयात जाणार आहोत. ज्यांनी ही कारवाई केली त्यांच्यावर कारवाई व्हावी
Web Title: prakash ambedkar sambhaji bhide nagpur maharashtra