किचनच्या रिंगणात रोहित पवार अनं पंकजा मुंडे यांच्यात अटीतटीचा सामना...Pankaja Munde,Rohit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar,Pankaja munde

किचनच्या रिंगणात रोहित पवार अनं पंकजा मुंडे यांच्यात अटीतटीचा सामना...

'झी मराठी'वरील 'किचन कल्लाकार' कार्यक्रम आता हळूहळू जम पकडू लागलाय. सुरुवातीला हा जरी 'कुकरी शो' वाटत असला तरी कलाकारांना इथे नुसती डिश बनवायची नाहीय. तर दिलेल्या थोड्या साहित्यातून चविष्ट पदार्थ बनवायचा आहेत. कधीकधी अगदीच एखादा पदार्थ बनवण्यासाठी संबंध नसलेल्या पदार्थातनं नवीन क्रिएटिव्ह काहीतरी बनवण्याचा टास्क सॉल्लीड रंगत आणतोय कार्यक्रमात. अगदीच जेवण रुचकर बनवणा-या सेलिब्रिटींचीही अनेकदा फसगत होताना पहायला मिळतेय. पण शो टी.आर.पीच्या रेसमध्ये येतोय,कारण प्रेक्षकांना तो आवडतोय. आतापर्यंत शो मध्ये कलाकार मंडळी येत होती पण आता राजकारण्यांना शो मध्ये निमंत्रित करून चॅनलने चांगला झणझणीत तडका शो ला द्यायचा प्रयत्न केलाय. अर्थात यामुळे पाहणा-या प्रेक्षकांना मात्र धम्माल येणार हे निश्चित.

हेही वाचा: हॉलीवूडमध्ये दीपिकाच्या हिंदीच्या क्लासला मोठा डिमांड;पहा झलक...

'झी मराठी'नं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक प्रोमो शेअर केलाय. ज्या प्रोमोत रोहित पवार(Rohit Pawar),पंकजा मुंडे(Pankaja Munde),प्रणिती शिंदे(Praniti Shinde) किचनच्या मैदानात आमने सामने एकमेकांना टशन देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे किचनमध्येही ही नेतेमंडळी खुर्चीसाठी लढताना दिसणार आहेत. विसरलेले पदार्थ बाजारपेठेतून आणण्यासाठी या स्पर्धकांना कधी खुर्चीचा तर कधी युतीचा सामना करावा लागणार आहे. यावेळी 'राज शेफ' म्हणून युटु्यबर म्हणून प्रसिद्द असलेल्या कूक मधुरा बाचल यांची धमाकेदार एन्ट्री झालेली पहायला मिळणार आहे.

कार्यक्रमाचा हा एपिसोड चांगलाचं रंगलेला पहायला मिळणार आहे. पंकजा मुंडेंनी सांगितलेला गटारी अमावस्येला त्यांची फजिती झालेला किस्सा,तर प्रणिती शिंदे यांनी केलेली पायलटसारखी घोषणा आणि रोहित पवार यांनी मध्येच मारलेली राजकीय कोपरखळी सारं काही एका चविष्ट डीश पेक्षा कमी नसणार हे नक्की. तेव्हा किचन कल्लाकारचा हा भाग पहायला विसरू नका.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top