हसन मुश्रीफ,सतेज पाटलांनी आमचा वापर केला; सेनेचा आरोप

वापरा आणि फेकून द्या मुश्रीफ, पाटलांची संस्कृती ; चंद्रदीप नरके
satej patil, hasan mushrif, Chandradeep Narke
satej patil, hasan mushrif, Chandradeep NarkeEsakal

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil)आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) शिवसेनेला (Shivsena) सामावून घेतली अशी अपेक्षा होती. पण या दोन्ही नेत्यांकडून जिल्हा बँकेच्या निवडणूकीत 'वापरा आणि फेकून द्या' हीच संस्कृती दिसून आल्याची टिका माजी आमदार चंद्रदीप नरके (Chandradeep Narke) यांनी आज केली. तर, जिल्हा बँकेत राजकारण आणले नाही, अस म्हणून सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांकडून सांगितले जाणारे संत वचन बंद करावे, अशी टिका आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar)यांनी आज केली. शिवसेनेच्यावतीने येथील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

satej patil, hasan mushrif, Chandradeep Narke
सोमय्यांची ईडी चौकशी थांबवण्यासाठी भाजपशी मुश्रीफांचे साटेलोटे

माजी आमदार नरके म्हणाले, पाटील व मुश्रीफ यांच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या. गोकुळ, जिल्हा परिषद, शिक्षक मतदार संघ, पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत आम्ही एकत्र आलो. त्यांनी आम्हाला दिले तसे आम्ही ही त्यांना भरभरून दिले आहे. मात्र आता आमच्या सर्वांचा याठिकाणी वापर केला गेला. आमदार पी. एन. पाटील हे आमचे विरोध आहेत. विधानसभा त्यांच्याविरूध्द लढलो. मात्र, जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा मुलगा राहुल पाटील यांना अध्यक्ष केले.

तालुक्यात एकमेकांविरोधातील राजकारण असूनही महाविकास आघाडी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या सूचना पाळून आम्ही राहुल पाटील यांना अध्यक्ष करण्यात मदत केली. तरीही, तुम्ही जिल्हा बँकेच्या निवडणूकीत शिवसेनेला मदत का करत? नाही, असाही सवाल श्री नरके यांनी केला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत घोडेबाजार झाल्याची कबुली दिली. त्यावेळी मी त्यांचे कौतुक केले. कारण राजकारणात चांगली लोक आली पाहिजे, यासाठी त्यांच्या मताशी मी सहमती दर्शवली. असे असताना त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणूकीत आमच्यातही कोणी चांगले आहे. असे का दिसले नाही, असाही टोला श्री नरके यांनी लगावला.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, जिल्हा बँकेत राजकारण होत नसेल तर आजरा कारखाना बंद का पडला? भोगावती आणि आजरा कारखान्यांवर कर्ज किती आहे, हे तपासून पाहायला पाहिजे, गडहिंग्लज कारखाना बंद पडण्याचे कारण काय? चंदगड कारखान्याची अवस्था काय झाली? हे सर्वश्रुत आहे. तत्त्वज्ञान सांगायचे, संत तुकारामांची गाथा सांगायची, राजकीय पादत्राणे बाहेर ठेवली म्हणूनही सांगायचे प्रत्यक्षा या सर्व राजकारणासाठी बँकेचा वापर केला जात आहे. गडहिंग्लज कारखाना स्थनिक लोकांनी वर्गणी काढून सुरु केला. हे जिल्हा बँकेचे मोठे अपयश आहे. आजरा कारखान्याचे एकूण कर्ज पाहिले किंवा कर्ज देतानाचे राजकारण पाहिले तर पादत्राणे बाहेर ठेवून करेक्ट कार्यक्रम केल्याचे दिसून येते. आताची भाषणे म्हणजे संत ज्ञानेश्वर यांच्यापारायणाला बसलो की काय असे वाटते. अशीही टिका केली.

बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्यासाठी पॅनेल मोडले का? उत्तर आमदार विनय कोरे यांनी द्यावे अशी सवाल श्री आबिटकर यांनी केला. यावेळी, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संपतराव पवार- पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर, गोकुळ संचालक अजित नरके, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार, सुरेश कुऱ्हाडे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com