''थर्डडिग्री टॉर्चर करून एन्काऊंटर केला पाहिजे''

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

दरम्यानच्या काळात फास्ट ट्रॅक न्यायलयातसुद्धा म्हणावं तसा लवकर निकाल लागत नाही, हे उन्नाव बलात्कार प्रकरणात समोर आलं आहे, त्यामुळे यापुढे बलात्कार करणाऱ्यांना थर्डडिग्री टॉर्चर करून त्यांचा एन्काऊंटर करायला पाहिजे आणि या केस मधील फाईल लवकरात लवकर बंद करुन पोलिसांना शाबासकी दिली पाहिजे.

मुंबई : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चार आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला त्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी पोलिसांच अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर आता पोलिसांच्या हेतूवर कोणताही संशय न घेता त्यांच्या पाठीशी सरकारने भक्कमपणे उभं राहावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हैदराबादमध्ये एन्काऊंटर केलेल्या पोलिसांना सरकारने क्लिनचिट द्यावी असे त्यांचे म्हणणे आहे. त्या म्हणाल्या, दरम्यानच्या काळात फास्ट ट्रॅक न्यायलयातसुद्धा म्हणावं तसा लवकर निकाल लागत नाही, हे उन्नाव बलात्कार प्रकरणात समोर आलं आहे, त्यामुळे यापुढे बलात्कार करणाऱ्यांना थर्डडिग्री टॉर्चर करून त्यांचा एन्काऊंटर करायला पाहिजे आणि या केस मधील फाईल लवकरात लवकर बंद करुन पोलिसांना शाबासकी दिली पाहिजे.''

दहा दिवसांपूर्वी, हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून, तिला जिवंत जाळण्यात आले होते. या प्रकरणातील चारही संशयित आरोपींना आज, सायबराबात पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पण, आज, एन्काऊंटरनंतर घडलं ते योग्यच घडलं, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

हैदराबाद पोलिसांची भूमिका संशयास्पद : उज्वल निकम

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत. घटनास्थळाची तपासणी करण्यासाठी त्यांना नेण्यात आले होते, तेव्हा पळून जाण्य़ाचा प्रयत्न करताना त्यांचा पोलिसांकडून खात्मा करण्यात आला आहे. हैदराबाद पोलिसांना त्यांच्या या धाडसाबद्दल, त्यांच्या कामगिरीबद्दल सारा देश त्यांना शुभेच्छा देत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Praniti Shinde says accused should be given 3rd degree torture