प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप! पराभवाच्या भीतीने भाजपकडून अनेकांना अटकेच्या, गुन्हे दाखल करण्याचा व मागच्या फाईली काढण्याच्या धमक्या

भाजपला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने आता अनेकांना गुन्हा दाखल करू, अटक करू, मागील केसच्या फाईली काढू अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी (ता. २९) प्रचारसभेत केला.
loksabha election
loksabha electionsolapur

सोलापूर : भाजपला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने आता अनेकांना गुन्हा दाखल करू, अटक करू, मागील केसच्या फाईली काढू अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी (ता. २९) प्रचारसभेत केला. पण, आता जनता १० वर्षांतील महागाई, भ्रष्ट्राचार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या हे प्रश्न विसरलेली नाही, निश्चितपणे त्यांच्या धमक्यांना न घाबरता भाजपला त्यांची जागा दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारानिमित्त सोलापुरातील कर्णिकनगर येथे उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. त्यावेळी आमदार प्रणिती शिंदेंनी भाजपचा १० वर्षातील कारभार चव्हाट्यावर आणला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, नरसय्या आडम, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, पुरूषोत्तम बरडे, अजय दासरी, संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे, अमर पाटील, स्मिता पाटील, प्रताप चव्हाण, संजय पोळ, राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल, ॲड. युन. एन. बेरिया, भारत जाधव, महेश कोठे, काँग्रेस नेते सुदीप चाकोते, शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रा. अशोक निंबर्गी, सुरेश हसापुरे, प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते.

आमदार प्रणिती म्हणाल्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन भाजपने शिवसेना चोरली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव, पण विधानसभेत पहिल्यांदा आल्यानंतर त्यांनी जनतेचा शिपाई म्हणून काम केले. मात्र, भाजपने ज्यांच्या जीवावर महाराष्ट्रात ताकद निर्माण केली, त्यांनाच दगा दिला. हे सरकार मोदी- अंबानीचे असून आपण त्यांना १५ लाख रुपयांच्या अमिषातून २०१४, २०१९ मध्ये निवडून दिले, पण ते पैसे आपल्याला मिळालेच नाहीत. आता दुसरा गेला, याठिकाणी उपरा आला, तरीपण पंतप्रधान मोदी म्हणतात, त्याच्या चेहऱ्याकडे पाहू नका मला मतदान करा. महागाई वाढविली, बेरोजगारी वाढली, रॉकेल मिळत नाही, पेट्रोल- डिझेल, गॅस सिलिंडर महाग झाले, शेतकऱ्यांना हमीभाव नाही, त्यांचा कांदा निर्यातबंदी केली, एकही उद्योग सोलापुरात आणला नाही, स्मार्ट सिटी केवळ ३ टक्के भागत केली, पाण्याचा प्रश्न सोडविला नाही, तरीदेखील मते मागताना भाजपला लाज वाटत नाही, असा हल्लाबोलही केला. भाजपने पंतप्रधानांच्या सभेला विडी कामगारांना काम बंद करण्याची धमकी देऊन सभेला जबरदस्तीने नेल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

भर सभेत प्रणितींनी केली प्रतिज्ञा

मला तुमची लेक, बहीण म्हणून संसेदत सेवा करण्याची संधी द्या, तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असेन म्हणत आमदार प्रणिती शिंदेंनी भर सभेत प्रतिज्ञा करीत जनतेला विकासाची ग्वाही दिली. दुष्काळमुक्त सोलापूर शहर- जिल्हा करेन, खड्डेमुक्त सोलापूर करेन, विमानसेवा सुरू करेन आणि आयटी पार्क सोलापुरात आणेन व लोडशेडिंगमुक्त सोलापूर करेन, अशी प्रतिज्ञा त्यांनी यावेळी केली.

पंतप्रधान मोदींची हुकुमशहाकडे वाटचाल

देशाची लोकशाही सध्या धोक्यात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकुमशहा बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसने देशाला लोकशाही दिली, डॉ. बाबासाहेबांनी घटना लिहून प्रत्येकाचे हक्क व अधिकार निश्चित केले, पण आता भाजपला ही घटनाच बदलायची असल्याचा आरोप सुशीलकुमार शिंदेंनी केला. बाळासाहेबांनी नेहमीच मला सहकार्य केले, भाजपने मी मुख्यमंत्री असताना मला पाडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला होता. ते सोलापुरात आले पण माझ्याविरूद्ध प्रचार न करताच परतल्याची आठवण देखील त्यांनी यावेळी सांगितली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com