महाराष्ट्राच्या सत्तासमिकरणावरून काँग्रेसला टोमणा; प्रशांत किशोरांना नेटीझन्सचा दणका

वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

राजकारणातील चाणक्य समजले जाणारे आणि संयुक्त जनता दलाचे नेते प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवरून काँग्रेसला ट्विटरच्या माध्यमातून टोमणा मारला आहे. प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत कोणतेही महत्त्वाचे आणि सार्थक प्रयत्न न करता आपले राजकीय महत्त्व आणि सत्तेत भागीदारी कायम राखली आहे. 

नवी दिल्ली : राजकारणातील चाणक्य समजले जाणारे आणि संयुक्त जनता दलाचे नेते प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवरून काँग्रेसला ट्विटरच्या माध्यमातून टोमणा मारला आहे. प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत कोणतेही महत्त्वाचे आणि सार्थक प्रयत्न न करता आपले राजकीय महत्त्व आणि सत्तेत भागीदारी कायम राखली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

या ट्विटनंतर प्रशांत किशोर यांना मात्र नेटीझन्सनी ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. अविनाश श्रीवास्तव यांनी प्रशांत किशोर यांना 'चापलुसी करणे काही सोपे काम नाही' असा टोमणा मारला आहे. तर राजेश कुमार म्हणतात, "तुम्ही काही बोलू नका. तुम्ही पैशांचे आहात. जो तुम्हाला पैसा देईल त्याचा प्रचार तुम्ही करता." 

अरुण शहा यांनी आपल्या ट्‌विटमध्ये प्रशांत किशोर यांचा शिवसेनेचे राजकीय सल्लागार असा उल्लेख केला. ते म्हणतात, कॉंग्रेसवर आज आपण टीका करताय पण तुम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आपण कॉंग्रेसला आपली सेवा दिली. बिहारमध्ये आपण कॉंग्रेस, राजद तसेच जदयु या पक्षांची आघाडी घडवून आणली होती.

असं काय आहे या फोटोत जो सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरतोय !

राज आनंद सिंह यांनी तर प्रशांत किशोर यांचा ' कोणतेही महत्त्वपूर्ण व सार्थक प्रयत्न न करता राजकारणात आपले महत्त्व टिकवण्यात आणि पैसे कमावण्यात कोणीही हात धरू शकत नाही.' असा टोला लगावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prashant Kishore Criticize Congress on maharashtra politics