
इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन मीच केला होता, अशी कबुली प्रशांत कोरटकरने पोलिसांसमोर दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. खरंतर इंद्रजित सावंतांना केलेल्या धमकीच्या फोन कॉलमध्येच कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर प्रशांत कोरटकरविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. त्याच्या अटकेची मागणी जोर धरत होती. तिकडे प्रशांत कोरटकरलाही इंद्रजित सावंत हा किती मोठा माणूस आहे आणि त्यांच्या पोस्टनंतर प्रकरण इतकं तापेल याची बहुदा कल्पनाच नसावी. पण कोरटकरच्या बाबतीत 'अब आया ना ऊंट पहाड़ के नीचे' अशी स्थिती झाली आहे.