esakal | राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांना प्रवीण दरेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Pravin-Darekar

NCP ने फडणवीसांवर केलेल्या आरोपांना प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: "भाजप (bjp) सरकारला अडचणीत आणण्यासाठी कटकारस्थान करून बदनाम करण्याचा प्रयन्त करत आहे. जे अधिकारी आरोप करत आहेत. त्यांची बैठक आधी विरोधी पक्षनेते (opposition leader) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यासोबत झाली होती" असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी केला. या आरोपाला विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे.

"तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा सरकार म्हणून विश्वास नाही. तुमचं नियंत्रण नाही, असा नवाब मलिक यांना माझा सवाल आहे. आयएएस, आयपीएस चुकीच्या कामांना पाठबळ देत नाहीत. अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी सातत्याने महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार कोणाचही असलं, तरी सकारात्मक भूमिका घेतली आहे" असे प्रवीण दरेकर म्हणाले.

हेही वाचा: Money Heist: पाकिस्तानच्या किराणा दुकानात दिसला 'प्रोफेसर'

"तुमचा उद्देश जनहिताचा नसेल, विकासाचा नसेल, व्यक्तीगत हिताचा असेल, म्हणून आयएसएस, आयपीएस मदत करत नसतील. जर चुकीचं होत असेल तर विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांच्यापर्यंत माहिती जात असेल. पण म्हणून ठरवून कोणीही मुद्दामून देवेंद्र फडणवीसांना माहिती देत नाही" असे प्रवीण दरेकर म्हणाले. भाजपाकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न होतोय, या आरोपावर "भाजपाच्यावतीने कुठल्याही जबाबदार नेत्याने सरकार पाडण्याच्या बाबतीत वक्तव्य केलेलं नाही. तिघांमध्ये चांगला समन्यवय आहे, तेच एकमेकांना कधी पाडतील हे कळणार नाही" असे उत्तर प्रवीण दरेकर यांनी दिले.

हेही वाचा: गणेशोत्सवात निर्बंधाची शक्यता, तीन दिवसांत नियमावली

नवाब मलिक यांचा काय आरोप आहे...

भाजप सरकारला अडचणीत आणण्यासाठी कटकारस्थान करून बदनाम करण्याचा प्रयन्त करत आहे. जे अधिकारी आरोप करत आहेत. त्यांची बैठक आधी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली होती. भावना गवळी, अनिल देशमुख आणि इतर लोकांना राजकीय हेतूने कटकारस्थान रचून बदनाम करत आहेत. काही अधिकारी आरोप करत आहेत. त्यांची आरोप करण्याच्या आधी भेट झाली आहे. हा ठरवून कार्यक्रम होत आहे. या संस्थांचा राजकीय वापर होत आहे.

loading image
go to top