esakal | Money Heist: पाकिस्तानच्या किराणा दुकानात दिसला 'प्रोफेसर'
sakal

बोलून बातमी शोधा

Money Heist: पाकिस्तानच्या किराणा दुकानात दिसला 'प्रोफेसर'

Money Heist: पाकिस्तानच्या किराणा दुकानात दिसला 'प्रोफेसर'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

नेटफ्लिक्स Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वांत लोकप्रिय 'मनी हाइस्ट' Money Heist या वेब सीरिजचा पाचवा सिझन प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या स्पॅनिश वेब सीरिजने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. यातील प्रत्येक कलाकाराने दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. प्रोफेसरची भूमिका साकारणारा अभिनेता अल्वारो मोर्ते Alvaro Morte हा तर जगभरातील तरुणींच्या गळ्यातील ताईत ठरला आहे. सीरिजमधल्या त्याच्या लूकची नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. आता प्रोफेसरसारखाच दिसणारा एक तरुण सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. पाकिस्तानमधील एका किराणा दुकानातील तरुण हुबेहूब प्रोफेसरसारखा दिसत असल्याने त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'प्रोफेसरने आता पाकिस्तानात किराणाचं दुकान उघडलं आहे का', असा मजेशीर सवाल एका नेटकऱ्याने या फोटोवर केला. तर 'प्रोफेसरचं पाकिस्तानशी कनेक्शन आहे' असं दुसऱ्याने लिहिलं. या भूमिकेला जगभरातून इतका प्रतिसाद मिळेल याची अपेक्षासुद्धा नव्हती असं अल्वारो एका मुलाखतीत म्हणाला होता.

हेही वाचा: Money Heist 5: टोकियोच्या मृत्यूनंतर चाहते भावूक; ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

अल्वारो खऱ्या आयुष्यातही प्राध्यापक

अल्वारो मोर्ते हा वास्तव जीवनातही प्राध्यापक आहे. हे फार कमी जणांना माहित आहे. मोर्ते याने प्रोफेसरची महत्वाची भूमिका साकारली आहे. पोलीस ज्यापद्धतीनं विचार करतात त्यांच्यापेक्षाही दहा पावलं पुढचा विचार करणारा प्रोफेसर सर्वांच्या आवडीचा आहे. मालिकेच्या पाचही सिझनमध्ये प्रोफेसरची भूमिका सतत बदलत जाते. कधी तो मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो तर कधी मित्राच्या. वास्तव जीवनातही प्राध्यापक असणा-या मोर्तेचा स्वभाव पूर्णपणे वेगळा आहे. मालिकेतील प्रोफेसर आणि खऱ्या आयुष्यातील प्रोफेसर कमालीचे वेगळे आहेत. एका रिपोर्टनुसार त्यानं कॉलेजमधील मुलांना शिकवले आहे. फिनलँडमधील टेम्पेरे विश्वविद्यालयात लहान मुलांना त्याने साहित्याचे पाठ दिले आहेत.

loading image
go to top