काँग्रेस भाजपला घाबरली, PM मोदींच्या सुरक्षेवरुन प्रवीण दरेकरांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवरुन देशातील राजकारण तापले आहे.
Pravin-Darekar
Pravin-Darekaresakal

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवरुन देशात राजकारण तापले आहे. सर्व भाजप नेते काँग्रेसवर हल्लाबोल करित आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही निशाणा साधला आहे. काँग्रेस सरकार (Congress Government) भाजपला इतके घाबरले आहे की ते आता पूर्णपणे अविचारी वृत्तीने वागत आहे. या प्रकाराबद्दल काँग्रेस सरकारने देशवासियांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. आज बुधवारी (ता.पाच) सुरक्षेतील त्रुटींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंजाबमधील सभा रद्द करावी लागली आहे.(Pravin Darekar Attack On Congress Over PM Modi Security)

Pravin-Darekar
मंत्री शंकरराव गडाख-घुले झाले व्याही-व्याही, उदयन व निवेदिता यांचा साखरपुडा

आंदोलनामुळे उड्डाणपुलावर सुमारे पंतप्रधानांचा ताफा अडकून पडला होता. या घटनेमुळे दरेकर यांनी काँग्रेसचा ट्विट करुन टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वांनी मोदी यांच्या सुरक्षेवरुन काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.

Pravin-Darekar
PM मोदी पुलावर अडकल्यानंतर नड्डांची काँग्रेसवर आगपाखड

पंतप्रधान मोदी (PM Modi) भटिंडा विमानतळावर पोहोचल्यावर घडलेल्या घटनेवर म्हणाले, तुमच्या मुख्यमंत्र्यांना (पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी) धन्यवाद म्हणा की मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com