बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना; प्रविण दरेकरांचा रोख कुणावर? I Pravin Darekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pravin darekar

'राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसला संपवण्याचा काम करतंय'

बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना; प्रविण दरेकरांचा रोख कुणावर?

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक दिल्लीत मंगळवारी पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. यावेळी त्यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. उपस्थितांनी हात वर करून प्रस्ताव पास केला. यानंतर आता राजकीय वर्तुळात यावर प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसला (Congress) संपवण्याचा काम करत आहे. या दोन्ही पक्षांचं अस्तित्व नियोजन पद्धतीनं कस कमी करता येईल यासाठी ते प्रयत्नशील असल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे.

हेही वाचा: ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसचे २५ आमदार नाराज, सोनिया गांधींची घेणार भेट

दरेकर यांनी ट्विटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ते म्हणतात, बेगाना शादी में अब्दुल्ला दीवाना अशी एक म्हण आहे. आता युपीएचा अध्यक्ष असून हा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्ते कसा होऊ शकतो. एकवेळ काँग्रेस कार्यकारिणी ठराव झाला असता तर त्याला महत्त्व प्राप्त झालं असतं. आपल्या पक्षाच्या विंगमध्ये ठराव करायचा आणि युपीएचा अध्यक्ष करा म्हणायंच हे संयुक्तिक नाही. त्याला काही अर्थही प्राप्त होत नाही. आज कॉंग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेस सर्व मुद्दे बाजूला ठेवून युपीएचा अध्यक्ष करणार का नाही याची काही कल्पना नाही. कॉंग्रेसचं अस्तित्व महत्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसला संपवण्याचा काम करत आहे. पक्षाच्या भूमिका, विकास कामांच्या बाबतीत शिवसेना आणि काँग्रेसचं अस्तित्व कसं संपवता येईल यासाठी राष्ट्रवादी नियोजन पद्धतीनं काम करत असल्याचं दिसत असल्याची टिकाही त्यांनी केली आहे.

हेही वाचा: माझी वीज कशी कापता? झोपडपट्ट्या, दलित वस्त्यांची कापा - लोणीकर

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना युपीएचे अध्यक्षपद देण्याची चर्ची रंगली असताना मागे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष झाले तर आम्हाला आनंदच होईल, असे ते म्हणाले हेते. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांना एक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यूपीएचे नेते म्हणून शरद पवार यांचे नाव समोर केले जात आहे.

Web Title: Pravin Darekar Criticized On Ncp Sharad Pawar Upa President Election Shivsena Congress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..