राऊतांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दावर दरेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

भाजपाचे आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
politics
politicsesakal
Summary

भाजपाचे आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौर पेडणेकर यांच्यावर टीका करताना वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दावरुन भाजपाचे आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर 'सत्तेचा दुरूपयोग करून माझ्यावर गुन्हा दाखल केला असून हे सर्व खोटं असल्याचं स्पष्ट करत त्यांनी आरोप फेटाळले आहेत. दरम्यान आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आशिष शेलार यांची पाठराखण केली आहे. सत्तेचा गैरवापर करून आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता तर संजय राऊत यांनीही अपशब्द वापरले आहेत, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

politics
Political News : 'नगरपंचायत निवडणूक शिवसेना ताकदीने लढणार'

ते म्हणतात, संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप महिलांची गुन्हा दाखल करा अशी मागणी आहे. मारिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी नगरसेविका वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनात पोहचले आहेत. सत्तेचा वापर करत आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. संजय राऊत यांनी अपशब्द वापरले आहेत, तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा ही मागणी आमची आहे. राज्यसरकारच्या विकास कामांवर कोणी बोलत असेल तर त्यांचा गळा या सत्तेतील नेत्यांकडून दाबला जातो, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. यशवंत जाधव, संजय राऊत यांना वेगळा न्याय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

politics
महाआघाडीची राजकीय गणित बदलली; शिवसेनेच्या आमदाराला बसणार धक्का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com