शिवसेनेनं सत्तेसाठी 'हिंदुत्ववादी' भूमिका बासनात गुंडाळून ठेवलीये; दरेकरांचा जोरदार प्रहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pravin darekar

आपलं सरकार टिकवण्यासाठी शिवसेना आचार-विचार, भूमिका बदलत आहे.

शिवसेनेनं सत्तेसाठी 'हिंदुत्ववादी' भूमिका बासनात गुंडाळून ठेवलीये

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मागील काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यसरकारने या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरले आहे. राज्यसरकार या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने का पूर्ण करत नाही ? असा सवालही विरोधक विचारत आहेत. दरम्यान आता या मुद्द्यावरून भाजपाच्या प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विट करत त्यांनी शिवसेनेने सत्तेसाठी सर्व बासनात गुंडाळून ठेवले असल्याची टीका केली आहे.

ते म्हणतात, महाराष्ट्रात अलिकडच्या काळात राज्यव्यापी आंदोलन म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे पाहता येईल. एसटीच्या या संप आणि आंदोलनाबाबत प्रवाशांनीही कोणताच आक्षेप घेतलेला नाही. कारण प्रवाशांनाही सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संवेदना, भावना माहिती आहेत. मात्र एसटी कर्मचार्‍यांविषयी राज्यसरकारची भावना सहानुभूती आणि संवेदनशील दिसत नाही. या सरकारला अजून किती कर्मचाऱ्यांचे बळी हवे आहेत, हे त्यांनी सांगावं. आता जर कर्मचार्‍यांना न्याय दिला नाही तर त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि याला संपूर्णतः राज्यसरकार जबाबदार असेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

हेही वाचा: 'असा माणूस शतकांमधून एकदाच होतो'; मृणाल कुलकर्णी भावूक

पुढे ते म्हणाले, आपलं सरकार टिकवण्यासाठी शिवसेना आचार-विचार, भूमिका बदलत आहे. परंतु भाजपा आपली राष्ट्रवादाची भूमिका, देश हिताची भूमिका, हिंदुत्ववादी भूमिका सोडू शकत नाही. मात्र शिवसेनेने सत्तेसाठी सर्व बासनात गुंडाळून ठेवले असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे. तरीही या सरकारला जाग येत नाही.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना पोलिसांकडून अखेरची मानवंदना

loading image
go to top