
राज्यभर अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून मुंबई आणि पुण्यात थैमान घातले आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरुप आल्याचं दिसून आलं. मंगळवारी दिवसभर आणि रात्रभर पावसामुळे पुणे शहर आणि उपनगरामध्ये जनजीवन विस्कळीत झाले. तर मुंबईत अरबी समुद्र खवळल्याने मच्छिमारांना पुढील पाच दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.