७०० वर्षांपूर्वीचे भाकित सोशल मिडियावर व्हायरल! अडीच महिन्यानंतरही उजनी तळाशीच; सप्टेंबरअखेरीस पाणी सोडा, महापालिकेचे पत्र

औज बंधाऱ्यात ३० सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेरीस पाणी औजमध्ये पोचेल यादृष्टीने, उजनीतून पाणी सोडावे, असे पत्र महापालिकेने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला दिले आहे.
drought
droughtsakal

सोलापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात ३० सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेरीस पाणी औजमध्ये पोचेल यादृष्टीने, उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडावे, असे पत्र महापालिकेने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला दिले आहे. पाऊस झाल्यास हे नियोजन बदलू शकते, पण पाऊस नाही झाल्यास निश्चितपणे उजनीतून पाणी सोडावेच लागणार आहे. दरम्यान, उजनीतील पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन पंढरपूर व सोलापूर या दोन्ही शहरांसाठी एकावेळी साधारणतः १५ सप्टेंबरला भीमा नदीतून पाणी सोडण्याचे नियोजन सुरु आहे. तत्पूर्वी, कालवा सल्लागार समितीची परवानगी घेतली जाणार आहे.

उजनी धरण दरवर्षी १५ ते २० ऑगस्टपर्यंत १०० टक्के भरते, पण यंदा सप्टेंबर उजाडला तरीदेखील धरण १६ टक्क्यांवरच आहे. पावसाची शक्यता कमीच असून दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सध्या धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जात आहे.

उजनीवर सोलापूर, नगर, इंदापूर, बारामती, धाराशीव, कुर्डुवाडी, बार्शी, करमाळा या नगरपालिकांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तसेच धरण परिसरातील १००हून अधिक ग्रामपंचायती काही औद्योगिक वसाहतींना देखील उजनीचाच आधार आहे. पावसाने दडी मारल्याने ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचे संकट घोंघावत आहे. आता औज बंधाऱ्यात २५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे, त्यामुळे सप्टेंबरअखेरीस पाणी सोडावे, अशी मागणी महापालिकेने केली आहे.

शेतीला पाणी सोडले असते तर...

दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पिके माना टाकत असताना उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडणे आवश्यक होते. पण, धरणात १३ टक्के उपयुक्त साठा असल्याने कालवा सल्लागार समितीची बैठक होऊनही पाणी सोडण्यात आले नाही. दरवर्षी पावसाळ्यात चार-पाच मोठी धरणे भरतील एवढे पाणी उजनीतून खाली सोडून द्यावे लागते, तरीसुद्धा त्यासंदर्भात उपाययोजना होवू शकल्या नाहीत, हे विशेष. उजनीतून पिकांना पाणी सोडले असते तर कदाचित एक लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांना जीवनदान मिळाले असते, असे बोलले जात आहे.

तब्बल ७०० वर्षांपूर्वीचे भाकीत सोशल मीडियावर व्हायरल

जर अधिक महिना चैत्र असल्यास भूमीवर दुष्काळ पडेल. अधिक वैशाख असल्यास धान्य प्राप्तीने लोक आनंदित व सुखी होतील. ज्येष्ठ अधिक आल्यास राजेलोक मरण पावतील. अधिक आषाढ आल्यास पाऊस पडणार नाही. श्रावण अधिक आल्यास दुष्काळ पडेल. भाद्रपद दोन झाल्यास धान्यवृद्धीने सर्व सुखी होतील. अश्विनी अधिक आल्यास चोरांपासून भीती उत्पन्न होईल. याप्रमाणे भाडळीने सहदेवास सांगितले आहे. हा संदेश सध्याच्या दुष्काळजन्य स्थितीमुळे वेगाने व्हायरल होत असून यंदा दुष्काळ असून पाणी, धान्य जपून वापरा असे आवाहन केले जात आहे.

उजनीची सद्य:स्थिती

  • एकूण मृतसाठा

  • ७२.३० टीएमसी

  • जिवंत पाणीसाठा

  • ८.६८ टीएमसी

  • ‘उपयुक्त’ची टक्केवारी

  • १६.१० टक्के

  • दौंडवरून येणारा विसर्ग

  • ७४० क्युसेक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com