esakal | कोव्हॅक्‍सिन की कोव्हिशील्ड; गर्भवती महिलेने कोणती लस घ्यावी?
sakal

बोलून बातमी शोधा

कोव्हॅक्‍सिन की कोव्हिशील्ड; गर्भवती महिलेने कोणती लस घ्यावी?

कोरोनामुळे गर्भवती मातांसह नवजात शिशुंवर विपरित परिणाम होणार नाही, याची खबरदारी आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.

कोव्हॅक्‍सिन की कोव्हिशील्ड; गर्भवती महिलेने कोणती लस घ्यावी?

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर  : कोरोना (corona) झालेल्या गर्भवतींची नऊ महिन्यांच्या कालावधीपूर्वीच प्रसुती, बाळ विकलांग होणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागेल, अशी शक्‍यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वी गर्भवती मातांसह (Pregnant mothers) नवजात शिशुच्या सुरक्षिततेसाठी गर्भवतींचे लसीकरण केले जाणार आहे. राष्ट्रीय कोविड सल्लागार समितीच्या निकषांनुसार पूर्वीचा आजार असलेल्या (को-मॉर्बिड) गर्भवतींना कोव्हॅक्‍सिन (Covacin)तर सशक्‍त मातांना कोव्हिशील्ड (Covishield) लस (vaccine) टोचली जाणार आहे.(Pregnant mothers can also get the corona vaccine)

हेही वाचा: शिक्षकांच्या पगारी 'या' कारणामुळे लांबणीवर! 1 तारखेला वेतन नाहीच

सोलापूर जिल्ह्यातील 52 हजार गर्भवती महिलांसह राज्यातील जवळपास 29 लाख महिलांचे लसीकरण तीन महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. कोव्हॅक्‍सिन लस टोचल्यानंतर 30 दिवसांत दुसरा डोस तर कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर 84 दिवसांत दुसरा डोस टोचणे अपेक्षित आहे. लसीकरणावेळी त्या महिलांच्या मोबाईलवर दुसऱ्या डोसचा मेसेज पाठविला जाणार आहे. एखादी गर्भवती माता लस घेण्यास तयार नसल्याने तिचे वारंवार समुपदेशन केले जाणार आहे. दरम्यान, हिपेरिन, ऍस्पिरिन (रक्‍त पातळ करण्याची औषधे) व रक्‍तवाहिनीत रक्‍ताच्या गुठळ्या होणारा आजार असलेल्या गर्भवती आणि गर्भाशयाबाहेरील गर्भधारणा (आयव्हीएफ) केलेल्या मातांना वैद्यकीय महाविद्यालयातच लस टोचली जाईल, असेही निकषांत नमूद करण्यात आले आहे. कोरोनामुळे गर्भवती मातांसह नवजात शिशुंवर विपरित परिणाम होणार नाही, याची खबरदारी आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 199 शाळा मुख्याध्यापकांविनाच !

गर्भवती महिलांना लस टोचताना...

-अशक्तपणा, उच्च जोखमीच्या मातांना कोव्हॅक्‍सिन तर कमी जोखमीच्या मातांना कोव्हिशील्ड लस द्यावी

- विस्मरण, मानसिक आजार व हृदयविकार असलेल्या मातांचे लसीकरण वैद्यकीय महाविद्यालयातच

- टीडी आणि कोविड लस एकाच दिवशी देता येईल; परंतु दोन्ही बाजू वेगळ्या असाव्यात

- अँटी-डी आणि कोविड लस एकाच दिवशी देता येईल; आठवड्यानंतरही घेता येईल कोविड लस

- गर्भवती कोविड पॉझिटिव्ह असल्यास, कोरोनातून बरे झाल्यानंतर महिन्यांनी घेता येईल लस

- दीर्घकालीन गर्भनिरोधक गोळ्यांवरील स्त्रियांचे एकमत तयार करून त्यांनाही लस टोचता येईल

- गरोदरपणातील लसीकरणामुळे बाळासह गर्भवती राहील सुरक्षित; लसीकरणानंतर 20 दिवसांपर्यंत राहणार पाठपुरावा

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील लस पुन्हा संपली !

गर्भवती महिलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने निकष ठरवून दिले आहेत. त्याचा आधार घेऊन जिल्ह्यातील सुमारे 50 हजार गर्भवती मातांचे शुक्रवारपासून लसीकरण सुरू केले जाईल. लसीकरणातून गर्भवती महिलांसह बाळ सुरक्षित राहणार आहे.

- डॉ. अनिरूध्द पिंपळे, जिल्हा समन्वयक, लसीकरण, सोलापूर

loading image