
बुलढाण्यातील एका गर्भवती महिलेच्या गर्भातल्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आलीय. जगात अशा २०० केसेस आतापर्यंत सापडल्या असून भारतात ९ ते १० वेळा असं समोर आलंय. बुलढाणा जिल्हा रुग्णालयात एक गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी आली असताना तिची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनाही मोठा धक्का बसला.