Ajit Pawar: अजित पवार अल्पसंख्यांक नेत्याला देणार राज्यसभेची खासदारकी? निवडणुकीसाठी या नेत्यांमध्ये मोठी शर्यत

Ajit Pawar: राज्यसभा निवडणुकीत एका जागेसाठी का होईना उमेदवारी मिळणार का याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू झाल्या आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarEsakal

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशभरातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच अनेक छोटे राजकीय पक्ष मोठ्या पक्षासोबत किंवा सत्ताधारी पक्षांसोबत गेले. त्याउलट महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठ्या पक्षात फूट पडली. त्यातील नेत्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपसोबत जात सत्तेत सोमील होण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण घडामोडी घडल्या त्यानंतर आता काही दिवसांवरच राज्यसभा निवडणूक आली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपसोबत गेलेल्या पक्षांना जागा मिळवण्यासाठी पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत, आता या पक्षांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अशातच काही दिवसांपुर्वी आपल्या समर्थक आमदार खासदारांसोबत भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) ला या राज्यसभा निवडणुकीत एका जागेसाठी का होईना उमेदवारी मिळणार का याच्या हालचाली पक्षात सुरू झाल्या आहेत. ही उमेदवारी कोणाला द्यायची. कारण येत्या काही दिवसात लोकसभा, विधानसभा निवडणुका आहेत त्या अनुषंगाने फायदा कोणाचा होऊ शकतो. यासोबतच इतरही गोष्टींचा विचार, राजकीय समीकरण या जागेला जोडलेली आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील(अजित पवार गट) राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत अनेकांच्या नावांची चर्चा सध्या सुरू आहे. यामध्ये इंद्रिस नाईकवडी, नकतेच काँग्रेस सोडून पक्षात प्रवेश केलेले बाबा सिद्दीकी, नवाब मलिक यांच्याही नावाची राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चर्चा सध्या सुरू आहे.

Ajit Pawar
Ashok Chavhan On Resign: '....फक्त दोन दिवस थांबा', काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य

नवाब मलिक

नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे जुने नेते आहेत. कार्यकर्ते राहिले आहेत. मंत्री राहिलेले आहेत. काही काळाआधी भाजपने नवाब मलिकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्याचबरोबर नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास भाजपने विरोध केला आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या काळात भाजपने त्यांना महायुतीत घेण्याबाबत भाजपने पत्र लिहून विरोध देखील केला आहे.

इंद्रिस नाईकवडी

इंद्रिस नाईकवडी हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत. त्याचबरोबर ते अजित पवार गटाचे अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

बाबा सिद्दीकी

बाबा सिद्दीकी यांनी आपला ४८ वर्षांचा काँग्रेस पक्षासोबतचा प्रवास थांबवला. पक्षाचा हात सोडत त्यांनी दोन दिवसांपुर्वी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हा अद्याप काँग्रेसमध्येत आहे.

Ajit Pawar
Vishwajeet Kadam: विश्वजीत कदमसुद्धा काँग्रेस सोडणार? अशोक चव्हाणांसोबत ११ आमदार! BJP ऐवजी अजित पवारांच्या पक्षाचा ऑप्शन खुला

ही तिन्ही नावे अल्पसंख्याक समाजातून येतात. राष्ट्रवादी काँग्रेसला अल्पसंख्याक समाजातून एक प्रतिनिधी पाठवायचा असल्याची चर्चा सुरू आहे. अल्पसंख्याक समाजाचा प्रतिनिधी जर राज्यसभेवर गेला तर जुन्या प्रथेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकांना प्रतिनिधीत्व देत आहे हे ही नव्या रचनेमध्ये दिसून येईल. भाजपसोबत सरकारमध्ये गेलो तरी काही फरक नाही हे दाखवण्यासाठीही हा प्रयत्न आहे.

नवाब मलिक यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे. भाजपने पहिल्यांदाच त्यांना महायुतीत घेण्यास नाराजी दर्शवली होती. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तर बाबा सिद्दीकी यांना मिळण्याची शक्यता आहे कारण ते आधी मंत्री राहिले आहेत, ३ वेळा ते आमदार राहिले आहेत. त्यांचा मुंबईतील जनसंपर्क देखील तगडा आहे. बॉलीवूड क्षेत्रात त्यांची चांगलीच चलती आहे. पण, काल नव्याने पक्षात आलेल्या नेत्याला अजित पवार उमेदवारी देणार का? हा प्रश्न आहे. तर त्यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील इतर नेत्यांची नाराजी त्यांना ओढवून घ्यावी लागेल.

Ajit Pawar
Devendra Fadanvis on Ashok Chavan: अशोक चव्हाणांसोबत अनेक नेते भाजपच्या वाटेवर? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आगे आगे देखो..'

इंद्रिस नाईकवडी यांना उमेदवारी दिली तर ते जयंत पाटील यांना आव्हान उभं करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. जयंत पाटील यांच्या तुलनेत इंद्रिस नाईकवडी हे ज्युनिअर आहेत. मात्र, त्या भागातील मोठा वर्ग त्याच्यामागे आहे. इंद्रिस नाईकवडी यांना संधी दिली तर त्यातून एक मोठा संदेश जाईल. तो म्हणजे जरी राज्यात भाजपसोबत असलो तरी आपण आपले मुळ सोडलेले नाही. त्यामुळे त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा आहे.

Ajit Pawar
Ashok Chavan: राजीनामापत्रात काय लिहिलंय ? पेनाने लिहिलेल्या एका शब्दामुळे अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याबद्दल झालं स्पष्ट

नवाब मलिक यांची राज्यसभेवर जाण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे इंद्रिस नाईकवडी आणि बाबा सिद्दीकी यांच्या नावांची चर्चा जरा जास्त आहे. तर ही अल्पसंख्याक नावे सोडली आणि दुसरं कोणाला उमेदवारी जाहीर केली तर, ते ही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर, राज्यसभेसाठी पक्षातील काही नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. पण, उमेदवार कोण असेल त्याबाबत भाजपच्या मोठ्या नेत्यांशी त्यांना याबाबत चर्चा करावी लागेल, त्यांच्याशी सल्लामसलत करावी लागेल.

Ajit Pawar
Ashok Chavan: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; अशोक चव्हाण ११ आमदारांसोबत भाजपच्या वाटेवर? चर्चांना उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com